जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी पोपट (नाना) राळेभात प्रविण चोरडिया, पवन राळेभात, गणेश डोंगरे यांची स्विकृत नगरसेवक पदी निवड

0
775

जामखेड न्युज——

जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी पोपट (नाना) राळेभात

प्रविण चोरडिया, पवन राळेभात, गणेश डोंगरे यांची स्विकृत नगरसेवक पदी निवड

सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी जामखेड नगरपरिषद निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले व पंधरा नगरसेवक व नगराध्यक्ष पदावर विजय संपादन केला.

नगराध्यक्षा पदी प्रांजल अमित चिंतामणी 3682 मतांनी विजय मिळवला नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. यामुळे आता उपनगराध्यक्ष खुल्या प्रवर्गातील होणार हे निश्चित होते. 

उपनगराध्यक्ष पदी पोपट (नाना) राळेभात यांची निवड करण्यात आली यासाठी सूचक म्हणून प्रविण सानप तर अनुमोदक म्हणून प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक होते.

यावेळी बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष साठी ५ वर्षात प्रत्येक वर्षीसाठी १ म्हणजे ५ नगरसेवक यांना विभागून संधी देण्यात येईल.पहिल्यांदा उपनगराध्यक्ष उमेदवार म्हणून राळेभात पोपट दाजीराम’ यांना संधी देण्यात आली.

तर स्विकृत नगरसेवक म्हणून पाच नगरसेवका मागे एक यानुसार पंधरा नगरसेवक आहेत तीन स्विकृत नगरसेवक निवडी करण्यात आल्या भाजपाचे एकनिष्ठ असणारे प्रविण चोरडिया यांना स्विकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे.

यानंतर पवन राळेभात यांना स्विकृत नगरसेवकाची संधी देण्यात आली आहे. पवन राळेभात यांच्या मातोश्री कमल महादेव राळेभात यांचा निसटता पराभव झाला होता म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.

तिसरे स्विकृत नगरसेवक म्हणून गणेश डोंगरे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी भाजपच्या विजयात पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावली आमदार सुरेश धस यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार सुरेश धस यांना मानणारा मोठा वर्ग जामखेड मध्ये आहे त्यामुळे गणेश डोंगरे यांना संधी देण्यात आली आहे.

उपनगराध्यक्ष पोपट राळेभात तसेच स्विकृत नगरसेवक प्रविण चोरडिया, पवन राळेभात व गणेश डोंगरे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here