संजय कोठारी यांना समाजाला मदत करण्याचे व्यसन आहे – प्रा. मधुकर राळेभात मतदानरूपी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी नगराध्यक्ष, नगरसेवक व पत्रकार यांचा कोठारी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान

0
143

जामखेड न्युज——

संजय कोठारी यांना समाजाला मदत करण्याचे व्यसन आहे – प्रा. मधुकर राळेभात

मतदानरूपी टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार – नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी

नगराध्यक्ष, नगरसेवक व पत्रकार यांचा कोठारी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान

संजय कोठारी यांना समाजसेवेचे व्यसन आहे. ते चांगले व्यसन आहे असे व्यसन प्रत्येकाला असावे यातून अनेकांना जीवदान मिळाले आहे. कोठारी यांना समाजसेवेचा वारसा त्यांचे आजोबा व चुलते यांच्या कडून मिळालेला आहे. त्यांचे कार्य खूप महान आहे. तसेच सायकल यात्रेबाबत बोलताना ते म्हणाले की, आरोग्य, वृक्षारोपणाचा संदेश देत सायकल यात्रा निघते वीस वर्षांपासून ती अविरत चालू आहे. असे प्रा मधुकर राळेभात यांनी सांगितले.

पिंपळगाव जलाल (ता.येवला) येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपळगाव जलाल ते अहिल्यानगर, जामखेड, खर्डा, येरमाळा, तुळजापूर, अक्कलकोट ते गाणगापूर सायकल यात्रेचे सोमवारी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी जामखेडला आगमण झाले असता जामखेड येथे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली, कोठारी प्रतिष्ठान जामखेड आणि समर्थ हॉस्पिटल च्या वतीने विशेष स्वागत समारंभ तसेच नगराध्यक्षा व नगरसेवक सत्कार तसेच पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुकाका ज्वेलर्स अ. नगर चे संचालक आनंद कोठारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायधीश विक्रम आव्हाड, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नंदा प्रविण होळकर, अमित चिंतामणी, प्रा. मधुकर राळेभात, डॉ. भरत दारकुंडे, संजय कोठारी, विजय बोरकावडे, डॉ. सुधीर पवार, कांतीलाल कोठारी, विजय कोठारी, अशोक चोरडिया, राहुल राकेचा, धनंजय भोसले, अमोल तातेड, सागर झावरे, हर्षल कोठारी, सचिन देशमुख, अभय लुनिया, तात्याराम पोकळे, मनोज कुलकर्णी, श्रीराम डोके, सागर टकले, दिगंबर चव्हाण, मिठ्ठुलाल नवलाखा, प्रा.धनंजय भोसले, सचिन गाडे, दीपक भोरे, रोहन कोठारी, जया गव्हाळे, सरला कोठारी, श्वेता कोठारी यांच्या सह सर्व पत्रकार व अनेक मान्यवर तसेच नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, संजय कोठारी यांचे कार्य खुप महान आहे. अनेकांना जीवदान देण्याचे काम त्यांचे अविरतपणे सुरू असते. जामखेड करांनी आमच्या वर मतदानरूपी आशिर्वाद दिला आहे तो सार्थ ठरविणार असे चिंतामणी यांनी सांगितले.

यावेळी विजय बोरखडे, सागर झावरे, डॉ. सुधीर पवार, अभय लुनिया, मिठ्ठुलाल नवलाखा, आनंद कोठारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत कोठारी यांच्या कार्याचा गौरव केला.

मिठ्ठुलाल नवलाखा यांनी बोलताना सांगितले की, देशात कोठारी यांच्या कामाचा गौरव होत आहे. तसे त्यांचे कामच आहे. तसेच पत्रकारांच्या वतीने जामखेड शहरातील अडीअडचणी सोडविण्यासाठी नगरपरिषदेने कृती आराखडा तयार करावा. शहर स्वच्छ, सुंदर करावे, अतिक्रमणे हटवावीत शहरात महिला स्वच्छता गृहे उभारावीत, पाण्याची अडचण सोडवावी ही कामे केली तर पुढील वर्षी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांना नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद कोठारी म्हणाले की, संजय कोठारी यांच्या कडे अपघात ग्रस्तांना मदत करण्याचे धाडस आहे. रात्री अपरात्री मदतीसाठी तत्पर असतात हे कार्य शब्दात सांगता येत नाही. तसेच अमित चिंतामणी यांच्या नगरसेवक पदातील विकास कामापेक्षा प्रांजल चिंतामणी निश्चित जास्त कामे मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.

याच कार्यक्रमांमध्ये अहिल्यानगर येथील आनंद धाम फाउंडेशन ही संस्था अनेक वर्षापासून दहा रुपयांमध्ये पोटभर जेवण देत आहेत तसेच कोरोना काळामध्ये या संस्थेने लोकांना मोफत भोजन पुरवले आहे याची दखल कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी घेऊन यांना अन्नदाता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

चौकट
संगमनेर येथील 79 वर्षाचे बाजीराव कानवडे व त्यांच्या पत्नी हिराबाई कानवडे हे दरवर्षी सपत्नीक सायकल यात्रेत सहभागी होतात आजही त्यांचे आरोग्य ठणठणीत आहे. आपल्या सर्वांसमोर तो मोठा आदर्श आहे. सायकल यात्रेचे हे २० वे वर्ष आहे. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिल्या ग्लुकोमा सर्जन डॉ. मिसबाह शेख यांचा सत्कार करण्यात आला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here