जिजाऊ जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान गेल्या अकरा वर्षापासून मंगेश आजबे यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम
जिजाऊ जयंती निमित्त शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
गेल्या अकरा वर्षापासून मंगेश आजबे यांच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित शंभूराजे कुस्ती संकुलच्या वतीने मंगेश आजबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात सुमारे १२० रक्तदात्यांनी रक्तदान करत जिजाऊ साहेबांना वंदन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिजाऊ जयंतीनिमित्त मंगेश दादा आजबे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित अकराव्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामुळे आतापर्यंत तब्बल ५१७ रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचले आहेत. काही रुग्णांना मोफत तर काहींना अल्प दरात रक्त देऊन खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा करण्यात आली आहे.कार्यक्रमात बोलताना ह.भ.प. कैलास महाराज भोरे म्हणाले, रक्तदान करणे हे आपले कर्तव्य आहे. यातून अनेकांना जीवनदान मिळते.
जिजाऊंच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.” त्यांनी सर्व तरुण, कार्यकर्ते आणि मंगेश दादा आजबे यांचे कौतुक करत आभार मानले.
या रक्तदान शिबीरास कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी भेट दिली व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मंगेश आजबे यांनी गेली आकरा वर्षापासून जे रक्तदान शिबीर घेतात त्यास शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या या कार्याचे कौतुक केले.मंगेश दादा आजबे यांनी आपल्या मनोगतात जिजाऊंच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “जिजाऊंच्या संस्कारातूनच शिवराय घडले.
आज तोच खरा वारसा शेतकरी जपत आहे. कष्ट, संयम आणि संकटाशी झुंज देण्याची ताकद शेतकऱ्याच्या रक्तात आहे. शेतकरी अडचणीत असला तरी हार न मानता अन्यायाविरुद्ध उभा राहिला पाहिजे. जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांना समृद्ध शेती व सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या ”
सुधीर राळेभात यांनी मंगेश दादा यांच्या समाजकार्याची प्रशंसा करत सांगितले की, “रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे विविध उपक्रमांतून ते सातत्याने समाजसेवा करत आहेत. जिजाऊ जयंतीनिमित्त सर्व उपस्थितांचे आभार व शुभेच्छा देण्यात आले.
डॉ. हजारे यांनीही माहिती देताना सांगितले की, “हे शिबिर जिजाऊ उत्सवाच्या निमित्ताने सलग अकरावे वर्ष आहे. या काळात ५१७ रुग्णांना रक्तपुरवठा करून त्यांचे प्राण वाचवले गेले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. जिजाऊंचे कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देश व जगासाठी प्रेरणादायी आहे.”जिजाऊ जयंतीनिमित्त रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा हा आदर्श उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.