जामखेड तालुक्यातील मुलीने पटकावलाराज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक
वडील नसणाऱ्या मुलीची गगणभरारी
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे अंत्यत गरीब घरात जन्म आई वडील ऊसतोडणी साठी कर्नाटक येथे असताना 26 जानेवारी 2022 ला अपघातात वडिलांचे निधन झाले. यामुळे कु. भाग्यश्री भागवत सरगर ही अनाथ झाली. याच अनाथ मुलींने जिद्द चिकाटी व मेहणतीने राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
आमदार रोहित पवार यांना भाग्यश्री भागवत सरगरहिच्या विषयी माहिती सांगितली तेव्हा आमदार पवार यांनी लगेच तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत तिचे शिक्षण तसेच राहणे खाणे सर्व खर्च उचलला व शारदानगर बारामती येथे शिक्षणाची सोय केली. सध्या ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.
भाग्यश्री भागवत सरगर हिचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा सरगरवस्ती, देवदैठण 1ली ते 4 थी शिक्षण झाले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी तिची शिक्षणाची सोय बारामती येथे करत तिला दत्तक घेतले. बिकट परिस्थिती असताना तिने सतत परीश्रम घेऊन यावर्षी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
कुमारी भाग्यश्री भागवत सरगर ही सध्या इयत्ता आठवी शिकत असून तिने महाराष्ट्रात योगासन मध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. तिने देवदैठण ता जामखेड. चे नाव पूर्ण महाराष्ट्रभर उंच केले आहे.
तिच्या यशाबद्दल प्राथमिक शाळा देवदैठण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कॅप्टन लक्ष्मण भोरे, राहुल धेंडे, गोकुळ भोरे, अनिल दादा भोरे, सरगर सर, सुधाकर भोरे, भोरे चेअरमन, गाडे सर, गाडे मॅडम, मासळकर मॅडम, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष भरत भोरे व त्यांच्या मातोश्री यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चौकट आमदार रोहित पवारांचा स्तुत्य सामाजिक उपक्रमअनेक मुलांना घेतले दत्तक
कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक अनाथ होतकरू मुलांच्या शिक्षणाची सोय तसेच त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च रोहित पवार करत आहेत. यामुळे अनेक होतकरू मुलांनी आपले आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. यामुळे रोहित पवारांचे दातृत्व सिद्ध होत आहे.