जामखेडमध्ये कोल्हेवाडी शिवारात चोरट्यांचा विद्युत पंप, स्ट्राटर व केबल डल्ला!
जामखेड येथील कोल्हेवाडी शिवारात शेत गट क्र. ७४ मधील विहिरीवरून अज्ञात चोरट्याने २५,००० रुपयांचा विद्युत पंप व साहित्य चोरुन नेल्याची घटना घडली. फिर्यादी बापू विश्वनाथ कोल्हे (वय ४५, रा. कोल्हेवाडी, ता. जामखेड) यांच्या शेतातील हा प्रकार १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ५.३० घडला असून ते ३ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांचा तपास सुरू आहे.
यामुळे परिसरात शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. मोटारी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कोल्हे यांच्या , शेतातील विहिरीवर ७.५ एचपीचा सीआयआर आय कंपनीचा पाणपुडी विद्युत पंप, स्ट्राटर, केबल व रस्सी असे साहित्य चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरुन नेले. या चोरीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गुन्हा बीएनएस २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात झालेल्या या चोरीप्रकरणाने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे करीत आहेत.