जामखेड साकत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई, निकृष्ट प्रतिचे व अर्धवट काम ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

0
402

जामखेड न्युज——

जामखेड साकत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामात दिरंगाई, निकृष्ट प्रतिचे व अर्धवट काम

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

जामखेड साकत रस्त्याची खुपच दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे अनेक अपघात होतात वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. अर्धवट खड्डे बुजवून काम ठप्प झाले आहे. बुजवलेले खड्डे ही थातूर मातूर बुजवलेले आहेत. पुढे खड्डे बुजवले जातात व मागे परत खड्डे पडत आहेत जर नियमानुसार इस्टीमेट नुसार काम झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

जामखेड साकत रस्ता म्हणजे सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. रस्त्याची चाळणी झाली आहे. वाहने खिळखिळी तर वाहनचालकांचे मनके खिळखिळी झाली आहेत. ताबडतोब रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी हरीभाऊ मुरूमकर यांनी केलेली होती यानुसार टेंडर झाले आहे. कामही सुरू झाले आहे. पण काही खड्डे बुजवतात काही तसेच ठेवत आहेत. ठेकेदाराची मनमानी दिसून येत आहे. बांधकाम विभागाने ताबडतोब निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच चांगल्या प्रतीचे नियमानुसार काम करावे अशी मागणी होत आहे.

हरीभाऊ मुरूमकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्टीमेट नुसार काम करावे सर्व प्रकारची वेगवेगळ्या एमएम मध्ये खडी, योग्य डांबर, रोलिंग, रस्ता झाडण्यासाठी स्प्रे करणे असे सर्व इस्टीमेट नुसार असावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मुरूमकर यांनी दिला आहे. अनेक खड्डे तसेच ठेवले आहेत तसेच अनेक ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा चार दिवसांत जैसे थे झाले आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे. नेहमीच अपघात होत आहेत.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी केली होती यानुसार खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे पण चांगल्या प्रकारे खड्डे बुजवले जात नाहीत.

एका वर्षात साकत घाटात पंधरा ते वीस अपघात झाले आहेत यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. यामुळे ताबडतोब घाटाचे रूंदीकरण करण्याची मागणी होत आहे. तसेच सध्या खड्डे भुजवावेत अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here