मंदिराप्रमाणे स्मशानभूमीची सेवा महत्त्वाची – रामभाऊ मुरूमकर हरितसेवा म्हणजेच देशसेवा – धर्मवीर सालविठ्ठल

0
521

जामखेड न्युज——

मंदिराप्रमाणे स्मशानभूमीची सेवा महत्त्वाची – रामभाऊ मुरूमकर

हरितसेवा म्हणजेच देशसेवा – धर्मवीर सालविठ्ठल

सेवानिवृत्त झाल्यावर मंदिराप्रमाणे स्मशानभूमी ची सेवा करण्याचा संकल्प केला आणि आज गावातील दोन स्मशानभूमी हिरव्या गार झालेल्या आहेत. परिसरातील अनेक लोक स्मशानभूमी पाहण्यासाठी येतात असे रामभाऊ मुरूमकर यांनी सांगितले.

साकत येथे सेवानिवृत्त वन कर्मचारी राम मुरूमकर यांनी स्मशानभूमीत शेकडो झाडे लावून त्यांचे संवर्धन केले तसेच लोकसहभागातून संरक्षणासाठी कंपाऊंड केले यामुळे स्मशानभूमीचा कायापालट
केला आहे. याच वृक्षाचा पाचवा वाढदिवस व जिल्हा परिषद शाळा तसेच दलित स्मशानभूमी येथे नवीन वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक अहिल्यानगर, गणेश मिसाळ सहाय्यक वनसंरक्षक राहुरी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभम जाधव गटविकास अधिकारी जामखेड तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक अहिल्यानगर, गणेश मिसाळ सहाय्यक वनसंरक्षक राहुरी, माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल चव्हाण, उपसरपंच राजाभाऊ वराट, प्राचार्य श्रीराम मुरूमकर, सुदाम मुरूमकर, मुख्याध्यापक भरत लहाने, मोहन शेळके वनक्षेत्र अधिकारी, आप्पासाहेब (ईश्वर) मुरूमकर, सरपंच काकासाहेब चव्हाण, भाऊ पाटील, पोलीस पाटील महादेव वराट, दिनकर मुरूमकर, प्रमोद मुरूमकर, हरीभाऊ मुरूमकर, भीमराव मुरूमकर, बळीराम कोल्हे, रोहित घोडेस्वार, मिलन घोडेस्वार, गणेश वराट, बाळासाहेब वराट, मुख्याध्यापक वैजनाथ गीते, एकनाथ चव्हाण, राजाभाऊ मुरूमकर, नागराज मुरूमकर, त्रिंबक पुलवळे, दादासाहेब मोहिते, दिलीप घोलप, महारुद्र नेमाने, महादेव मुरूमकर सह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा गिताताई वराट जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व विद्यार्थी व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना धर्मवीर सालविठ्ठल उपवनसंरक्षक अहिल्यानगर यांनी सांगितले की, आज 2026 चा पहिला दिवस सत्कारणी लागला,हवा महत्त्वाची गरज आहे, स्वच्छ हवा यासाठी झाडे महत्त्वाची आहेत. भारतात हवा दुषित होत चालली आहे. यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे आहे हे रामभाऊ मुरूमकर यांनी ओळखले आणि स्मशानभूमी हरित केली आहे हीच खरी देशसेवा आहे.

यावेळी बोलताना डॉ. भगवानराव मुरूमकर म्हणाले की, रामभाऊ यांनी झाडांची सेवा केली, स्मशानभूमी सुंदर केल्या, आता जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण केले आहे याची निगाही केली जाणार आहे. स्मशानभूमी पाहण्यासाठी तालुक्यातील लोक येतात, हे महान कार्य आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शुभम जाधव गटविकास अधिकारी बोलताना म्हणाले की, निवारा, पाणी यासाठी शासकीय योजना आहेत. पण हवेसाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. ग्रामविकास अभियानात स्मशानभूमी वृक्षारोपण आहे. लोकसंख्या जेवढी तेवढी झाडे आवश्यक आहेत. नवीन वर्षाची सुरुवात वृक्षारोपण चांगले काम आहे.

दरवर्षी 1 जानेवारी रोजी वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो याच बरोबर नवीन वृक्षारोपण करण्यात येते. साकत येथील सामाजिक कार्यकर्ते राम मुरूमकर यांनी स्वतः च्या सेवानिवृत्ती निमित्त साकत येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण केले. तसेच या झाडांची स्वतः काळजी घेत दरवर्षी वाढदिवस व विविध सण समारंभ यानिमित्त वृक्षारोपण करतात. यामुळे स्मशानभूमी हरित झाली आहे.

आज स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे लहान मोठे झाडे झालेली आहेत. तसेच स्मशानभूमीची सुधारणा करण्याची संकल्पना भावकीपुढे ठेवली याला निस्वार्थी पणे करत असलेल्या कामाला खुप छान प्रतिसाद मिळाला आणि भावकीतून सुमारे पाच लाख रुपये लोकवर्गणी करून स्मशानभूमीचा कायापालट केला. स्मशानभूमीला तार कंपाऊंड केले व आतमध्ये वृक्षारोपण केले.

दलित वस्ती स्मशानभूमीचे काम हाती घेऊन तेथील लोकांचे मतपरिवर्तन करत याही स्मशानभूमीचा कायापालट केला कंपाऊंड करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे.

राम मुरूमकर स्मशानभूमीचा कायापालट करणारे अवलिया, राम मुरूमकर हे जानेवारी 21 मध्ये वनविभागातून सेवानिवृत्त झाले आणि त्याच दिवशी गावात वृक्षारोपण व स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा संकल्प केला यानुसार पाच लाख रुपये लोकसहभाग गोळा केला यातून कंपाऊंड तसेच परिसरात वड, पिंपळ, चिंच, आंबा, फुलझाडे लावली. या स्मशानभूमीचा कायापालट तर झालाच दलित वस्ती येथे असलेल्या स्मशानभूमीचा कायापालट केला यामुळे स्मशानभूमीचा कायापालट करणारा अवलिया राम मुरूमकर आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागराज मुरूमकर, सुत्रसंचालन एकनाथ चव्हाण तर आभार मा. प्राचार्य श्रीराम मुरूमकर यांनी मानले.

यावेळी विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावण्यात आले व शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here