सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या होणार नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा पदग्रहण समारंभ
संपूर्ण राज्यात चर्चेत असणारी जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भाजपने घवघवीत यश संपादन केले. नगराध्यक्षा पदी 3682 मतांनी विजय मिळवला. उद्या सभापती प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस आहे यानिमित्ताने उद्या जामखेड नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा पदग्रहण समारंभ होत आहे. सकाळी ९.३० वाजता होणार आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूक निकालात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्विवाद नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले नगराध्यक्षपदासह 15 जागांवर विजय मिळवत भाजपाने केवळ सत्ता मिळवली नसून, विरोधकांच्या राजकीय ताकदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी 3682 मोठ्या मताधिक्यांनी निवडून आल्याने भाजपने आपली ताकद दाखवली आहे. ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता प्रा. राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार अशी प्रतिष्ठेची लढाई बनली होती.
दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद लावली असताना भाजपाने मिळवलेला स्पष्ट कौल हा संघटनात्मक मजबुती, कार्यकर्त्यांचे जाळे आणि प्रा. शिंदेंचा वैयक्तिक जनसंपर्क यांचा परिणाम मानला जात आहे.
एक जानेवारी रोजी सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा पदग्रहण समारंभ पार पडणार आहे. यानिमित्त सर्व नगरसेवक व भाजपा पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूकीतील नगराध्यक्षा सह पंधरा नगरसेवक असे घवघवीत यश म्हणजे सभापती प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट म्हणता येईल. यामुळेच उद्या पदग्रहण समारंभ होत आहे.