राष्ट्रीय महामार्गाच्या दिरंगाई बाबत नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी अँक्शन मोडवर लवकरात लवकर रस्ता पुर्ण व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्र

0
1230

जामखेड न्युज——

राष्ट्रीय महामार्गाच्या दिरंगाई बाबत नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी अँक्शन मोडवर

लवकरात लवकर रस्ता पुर्ण व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्र

जामखेड नगरपरिषदेच्या नुतन नगराध्यक्ष यांनी आज जिल्हाधिकारी यांना पत्र देत राष्ट्रीय महामार्ग जामखेड सौताडा अपुर्ण कामामुळे जामखेड करांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे याबाबत पत्र देत जिल्हाधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात व काम करण्याचे आदेश द्यावेत असे पत्र दिले आहे.

आज जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४१ ड जामखेड सौताडा या रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्णत्वाकडे नेणे बाबत पत्र दिले यावेळी नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, नगरसेवक श्रीराम डोके, मनोज कुलकर्णी उपस्थित होते.

पत्रात म्हटले आहे की, सदर राष्ट्रीय महामार्ग ५४१ ड जामखेड सौताडा हा जामखेड शहरातून जात आहे. तसेच सदर रस्त्याचे काम अत्यंत दिरंगाईने चालु आहे. आपण याबाबत १० दिवसांपूवी जामखेड तहसिल कार्यालयात संबंधीत कार्यालयाचे अधिकारी, ठेकेदार यांना बोलवत कामा बाबत आढावा घेत तात्काळ रस्त्याचे काम करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.

जर रस्ता कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या परंतू अद्यापपर्यंत संबंधीत ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली दिसत नाही.

यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असून जामखेडच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी मे. साहेबांना विनंती की,

आपण दिलेल्या आदेशा नुसार संबंधीत ठेकेदाराकडून राष्ट्रीय महामार्ग ५४१ ड जामखेड – सौताडा या रस्त्याचे काम सुरळीत पणे चालु करून पुर्ण करण्यात यावे ही विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here