जामखेड नगरपरिषद निवडणुकीत रोहित पवारांना घेरण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेड मध्ये
जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. नेमके मुख्यमंत्री काय बोलतात याकडे जामखेड करांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या. या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना (उबाठा) , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट तसेच काँग्रेस व तिसरी आघाडी असे पक्ष एकमेकांविरुद्ध उभे आहेत. तसेच काही अपक्ष आहेत यामुळे मोठी रंगत वाढली आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना कार्यकर्ते नेते सोडून का जातात याचे आत्मपरीक्षण करावे तसेच विकास कामासाठी समोरासमोर चर्चा करण्यासाठी यावे या आव्हानांना आमदार रोहित पवार यांनी सांगितले की माझी कशातही तयारी आहे. तुम्ही वेळ व ठिकाण सांगा मी चर्चेसाठी तयार आहे.
तसेच जामखेड नगरपरिषद निवडणूक राज्यात गाजत आहे. एका कार्यकर्त्यांनी भाषणात विधानपरिषद सभागृहाचा अवमान केला म्हणून सभागृहातर्फे हक्क भंग नोटीस बजावली गेली याविषयी रोहित पवार म्हणाले की, मला घेरण्यासाठी भाजपा तर्फे मुख्यमंत्री येत आहेत. यामुळे राज्यात गाजत आता राज्यात प्रथमच कार्यकर्ता हक्क भंग घटना घडली आहे.
उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांच्या भांडणात जामखेड चा विकास खुंटला आहे त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात नगरपरिषद द्या जामखेड चा चांगला विकास करू अडीअडचणी सोडवू असे आवाहन केले आहे.
काँग्रेस, वंचित बहुजन पक्ष यांनी तिसरी आघाडी केली आहे यांनीही मोठी रंगत आणली आहे. कोण कोणाचे मते खाणार आणी कोणाला फायदा व तोटा होणार याचीच चर्चा रंगली आहे.
यातच प्रभाग दोन ब व चार ब निवडणूक स्थगित झाली आहे. आता येथे वीस तारखेला मतदान होणार आहे. आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.