राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुख मैदानी तोफ सुनील (आण्णा) शेळके यांची जामखेड मध्ये जाहीर सभा
आगामी जामखेड नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने भव्य जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शुक्रवार, दि. 28 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता, तहसील कार्यालया समोर, जामखेड येथे पार पडणार असून पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या सभेमध्ये पक्षाचे प्रमुख नेते तसेच विभागीय, जिल्हास्तरीय पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून आगामी निवडणुकीबाबत दिशा व धोरणे स्पष्ट करणार आहेत. मतदारांशी थेट संवाद साधत जामखेडच्या विकासासाठी पक्षाने आखलेल्या योजनांची माहिती देखील देण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थिती :
मा. आ. श्री. सुनील (आण्णा) शेळके ( आमदार मावळ )
मा. श्री. कल्याण (काका) आखाडे ( प्रदेशाध्यक्ष ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) मा. श्री. बाळासाहेब (काका) आजबे ( माजी आमदार आष्टी विधानसभा संघ ) मा. श्री. सुनील (भाऊ) मगरे ( प्रदेशाध्यक्ष सामाजिक व न्याय विभाग ) मा.श्री. गणेश (भाऊ) खांडगे (अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका ) मा. श्री. विठ्ठलरावजी शिंदे (मा. सभापती पं.स. मावळ तालुका) मा. श्री राजेंद्र ( काका ) गुंड ( प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )
मा. कु. संध्या (ताई) सोनवणे ( प्रदेशाध्यक्ष युवती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) मा.श्री. अक्षय (भाऊ) शिंदे ( प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी ) मा.श्री. अशोक सावंत ( जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर ) मा.श्री. बाळासाहेब शिंदे ( तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कर्जत )
सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विकासनिती, महिला सक्षमीकरण,पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील भविष्यकालीन योजना सर्वांसमोर मांडल्या जाणार आहेत. जामखेड विकासाच्या दिशेने नवे पर्व सुरू करण्यासाठी ही सभा मोलाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मा. आ. श्री. सुनील (आण्णा)शेळके ( आमदार मावळ ) यांच्या मार्गदर्शनाचा नागरिकांना लाभ मिळणार आहे. आगामीनिवडणुकीत विकासाची गती वाढविणे, नागरिकांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचविणे, युवक आणि महिलांना अधिक संधी देणे हे पक्षाचे प्राधान्यक्रम असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले जाईल.जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून सभेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर यांनी केले आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा महेश निमोणकर, प्रभाग एक सारीका संजय डोके, प्रभाग तीन सुरज अशोक निमोणकर, प्रभाग पाच द्वारका चंद्रकांत पवार, पुजा राजू शिंदे, प्रभाग सात नजमा नदिम सय्यद, मिठ्ठुलाल पोपटलाल नवलाखा, प्रभाग आठ गणेश भिकु काळे, प्रभाग नऊ मुक्ता दिगंबर म्हेत्रे, शेख इरफान सल्लाउद्दीन, प्रभाग दहा ताहेर सद्दोदिन शेख, प्रभाग बारा महेश भारत निमोणकर असे अकरा उमेदवार नगरसेवक पदाचे व एक नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत.