प्रभाग सहा मध्ये समस्याच समस्या याला जबाबदार कोण – ॲड. डॉ. अरुण जाधव
लाईट-पाणी नाही, गटार रस्त्यावर मच्छरांनी लोक आजारी नगरसेवकाने काय केले
जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. डॉ. अरुण हौसराव जाधव व सौ. संगिता रामचंद्र भालेराव हे गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या मनातील उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग क्रमांक ६ मधील मतदारांमध्ये उत्स्फूर्त आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजी धर्मयोद्धा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्लॉक, बीड रोडपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि महापुरुषांच्या घोषणा देत भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जवळपास एक हजार महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यानंतर आयोजित कॉर्नर सभेत बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले, घोडे आणि मैदान जवळ आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे मायबाप जनता दोन तारखेला दाखवून देणार आहे. जनता घाबरू नये, मी तुमचा भाऊ आणि मुलगा म्हणून पाठीशी उभा आहे.
ते पुढे बोलताना जाधव म्हणाले,चिम्या-गोम्या येतील,उलटसुलट बोलतील, पैसे देतील,त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका. आठ वर्षांपूर्वी हे कुठे होते? उंदराच्या बिळात बसले होते! आज वार्ड ६ मध्ये लाईट नाही, पाणी नाही, घरकुल नाही, गटार नाही. लोक मच्छरांनी आजारी पडतात.यांना जाब विचारा. आम्हाला मोठ्या मतांनी निवडून द्या, मी तुमचा सेवक बनून काम करीन.
या वेळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी,वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पक्ष व शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जैनब वाहेद कुरेशी व नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल अंकुश उगले यांनीही मनोगत व्यक्त केले.
लोक अधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापूसाहेब ओव्होळ म्हणाले, नागरिकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता ॲड. डॉ. अरुण जाधव आणि सौ. संगीता भालेराव यांना मोठ्या मतांनी विजय मिळवून द्या.
यावेळी अनिल पवार, मच्छिंद्र जाधव, शुभम जाधव, संतोष पवार, विशाल जाधव, भिमराव चव्हाण, अरविंद जाधव, बाजीराव पवार, अंकल घायतडक, विशाल गायकवाड, गोकुळ माने, सागर समुद्र, अतिश मेघडंबर, जितेंद्र समुद्र,गणेश घायतडक, बाळासाहेब साठे, मुकुंद घायतडक, रणजीत मेघडंबर, राम यादव, बाळासाहेब भालेराव, सचिन चव्हाण, सुमित भालेराव, पप्पू भालेराव, ऋषिकेश गायकवाड, रजनी बागवान, ललिता पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.