जामखेड नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षा पदासाठी ९ तर १०२ नगरसेवक रिंगणात
जामखेड नगरपरिषद निवडणूकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी असणाऱ्या तेरा पैकी चार उमेदवारांनी माघार घेतली नऊ जण रिंगणात आहेत तर १२० नगरसेवक पदासाठी असणाऱ्या १८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी सहा पक्षाचे व तीन अपक्ष असे ९ उमेदवार रिंगणात असल्याने मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी (शप), काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात खरी लढत रंगणार आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणुक जाहीर होताच इच्छुकांच्या गर्दी दिवसागणिक वाढत गेली. वातावरण तापले आहे. नगरसेवक पदासाठीजामखेड नगरपरिषद नगराध्यक्षा पदासाठी ९ तर नगरसेवकपदासाठी १२० उमेदवारी अर्ज वैध झाले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या ४ नगराध्यक्षपदाच्या तर १८ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
यामध्ये भाजपाच्या प्रांजलताई अमित चिंतामणी, राष्ट्रवादी (शप) काँग्रेसच्या संध्या शहाजी राळेभात, शिवसेना शिंदे गटाच्या पायलताई आकाश बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-सुवर्णा महेश निमोणकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या जैनब वाहेद कुरैशी, समाजवादी पक्षाच्या परविन सिराजुद्दीन शेख, प्रथम नगराध्यक्षा प्रिती विकास राळेभात (अपक्ष), नसीम सलीमभाई बागवान (अपक्ष), रेश्मा युन्नुस शेख (अपक्ष), यांच्यासह ९ उमेदवार रिंगणात आहेत.
आज अर्ज मागे घेतलेल्या नगराध्यक्षा उमेदवारांमध्ये प्रहारचे जनशक्ती चे शेख शहनाज नय्युम, आम आदमी पार्टीचे शेख रेहममुन्निसा कमाल, राळेभात प्रियांका दिनेश (अपक्ष) व माने वर्षा कैलास (अपक्ष) अशा एकुण चार जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.