जामखेड विकासाचे व्हिजन सह सर्वधर्मसमभावाचा नारा देत शिवसेनेची प्रचारात आघाडी जामखेड विकासाच्या व्हिजनवर आकाश बाफना यांनी निर्माण केला तिसरा पर्याय

0
410

जामखेड न्युज——-

जामखेड विकासाचे व्हिजन सह सर्वधर्मसमभावाचा नारा देत शिवसेनेची प्रचारात आघाडी

जामखेड विकासाच्या व्हिजनवर आकाश बाफना यांनी निर्माण केला तिसरा पर्याय

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस ला जबरदस्त टक्कर देत
युवा नेते आकाश बाफना व शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मैदानात उतरली आहे. जामखेड च्या विकासाच्या व्हिजन सह सर्वधर्मसमभावाचा नारा देत शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायलताई बाफना यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. आणि भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस ला जबरदस्त तिसरा पर्याय निर्माण केला आहे.

आकाश बाफना यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुक तयारी सुरु करत संपूर्ण शहर वाडी वस्तीवर मुरमीकरण, रस्ता प्रश्न, पाणी प्रश्न, विजेचा प्रश्न सोडविला यामुळे आज प्रत्येकाच्या मुखात एकच नाव आहे ते म्हणजे “जामखेड का सपना आकाश बाफना ” सर्व समाजाला बरोबर घेत प्रचाराचा शुभारंभ करत प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.

जामखेड च्या विकासाची ब्लू प्रिंट बाफना यांच्या कडे तयार आहे. सुसज्ज रस्ते, भूमिगत गटारे, पिण्याचे स्वच्छ पाणी, चांगल्या आरोग्य सुविधा या सह स्वच्छ सुंदर जामखेड साठी शिवसेना आवश्यक आहे. आणि सत्ता मिळाली तर स्वप्नातील जामखेड तयार करू असे बाफना यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या सामाजिक कामामुळे आज जामखेड ची जनता खुश आहे. बाफना यांच्या रूपाने जामखेड करांना तीसरा पर्याय निर्माण झाला आहे.

नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त निधी आणून जामखेड चा विकास करू जामखेड शहरात दोन दिग्गज असून देखील जामखेड करांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते नीट नाहीत, गटारांची दुरावस्था आहे. मोकाट जनावरे अशा अनेक समस्या आहेत. आम्ही जामखेडचा विकास करून चेहरा मोहरा बदलू स्वप्नातील जामखेड घडवू असे आकाश बाफना यांनी सांगितले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्व धर्म समभाव, विकासाचे व्हिजन, भयमुक्त जामखेड, स्वच्छ सुंदर जामखेड या मुद्द्यावर प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here