मोरेवस्ती वरील पदरमोड करून दुरूस्ती केलेल्या पुलाचे लोकार्पण
आदर्श फाऊंडेशन च्या माध्यमातून आकाश बाफना यांचा स्तुत्य उपक्रम
जामखेड नगरपरिषद हद्दीतील श्रीकृष्ण नगर मोरे वस्तीकडे जाणाऱ्या पडझड झालेल्या पुलाची दुरूस्ती आदर्श फाऊंडेशन चे अध्यक्ष आकाशशेठ बाफना यांनी स्वखर्चातून केली आहे. याचे काल आचारसंहिता लागण्याच्या आगोदर सकाळीचलोकार्पण मोरे वस्ती येथील नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. आकाश बाफना यांनी पुढाकार घेऊन पुल दुरूस्ती केल्या बद्दल मोरे वस्ती वरील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
श्री कृष्ण नगर मोरे वस्ती परीसरात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. याठिकाणी जाणारा रस्त्याची देखील दुरावस्था झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून हा पुल खचला होता मात्र मागिल वर्षी पुलाची एक बाजु पुर्णपणे पडली होती. पावसाच्या पाण्याने हा पुल वाहुन जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत होती मात्र प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात होते.
आकाश बाफना यांनी शहरासह वाडी वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण केले आहे. तसेच अनेक ठिकाणी लाईट ची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अनेक शाळांमध्ये चिखलांचे साम्राज्य होते तेथे मुरमीकरण केले. यावेळी आकाश बाफना यांनी सांगितले की, मुलांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून चिखलमुक्त परिसर केला आहे.
धोकादायक बनलेल्या पुलाची दुरूस्ती केल्याने मोरे वस्तीवरील नागरिकांनी आदर्श फाऊंडेशन व आकाश बाफना यांचे आभार मानले स्थानिक नागरिकांनीही आदर्श फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले आहे.
नादुरुस्त पुलामुळे नागरिकांचे खुपच हाल होत होते अपघातही होत होते. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली होती. पण प्रशासन ठप्प होते. ही गोष्ट आकाश बाफना यांच्या लक्षात आली त्यांनी लगेच आपल्या आदर्श फाऊंडेशन मार्फत पुलाची दुरूस्ती केले. आणि मोरे वस्ती वरील नागरिकांच्या हस्ते लोकार्पण केले.
आदर्श फाऊंडेशन ने शहरासह वाडी वस्तीवर कोट्यवधी रुपयांची पदरमोड करून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे जनतेच्या मनात नगराध्यक्ष पदासाठी पायलताई बाफना यांना पसंती मिळत आहे.