जामखेड न्युज——-
दिघोळ गण झाला सचिन (नाना) घुमरे मय
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सचिन घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघोळ गणामधे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सचिन (नाना) घुमरे यांनी वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी जपत दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप केले यामुळे संपूर्ण दिघोळ गणात सचिन घुमरे मय वातावरण निर्माण झाले आहे.

विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. आपण समाजाचे देणे लागतो या दृष्टीकोनातून दिघोळ गणातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

भाजप नेते रवी दादा सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थित वाटप करण्यात आले. खर्डा जिल्हा परिषद गटासाठी रविंद्र सुरवसे हे नाव आघाडीवर आहे तर दिघोळ पंचायत समिती साठी जातेगावच्या माजी सरपंच दिपाली ताई गर्जे, दिघोळच माजी चेअरमन मच्छिंद्र गीते, अँड सुभाष जायभय यांची नावे चर्चेत आहे.

“वाढदिवस साजरा करण्याचा खरा आनंद म्हणजे समाजाचे देणे फेडणे,” या भावनेला साजेसा उपक्रम राबवत जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा. श्री. सचिन (नाना) घुमरे यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केला. या निमित्ताने माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, मोहरी आणि जायभायवाडी, पिंपळगाव उंडा, वाघा, गुऱ्हेवाडी, महारुली येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण सचिन (नाना) घुमरे यांनी घालून दिले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, वि.का.से. सहकारी सोसायटीचे सदस्य, समस्त ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







