जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपोषणाची वेळ, सोमवार पासून करणार उपोषण

0
706

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपोषणाची वेळ, सोमवार पासून करणार उपोषण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन व राहणीमान भत्ता व भविष्य निर्वाह निधी थकबाकी देण्यात येऊन व योग्य कारवाई करण्यात यावी. अन्यथा जामखेड तालुक्यातील कर्मचारी सोमवार दि. ६ पासून जामखेड पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर अध्यक्ष वसंत जायभाय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, उपाध्यक्ष त्रिंबक पाचारणे, तालुका कार्याध्यक्ष दादा महारनवर, नानासाहेब साठे तालुका सचिव यांच्या सह्या आहेत. हे निवेदन गटविकास अधिकारी जामखेड यांना देण्यात आले आहे तसेच माहितीस्तव प्रत जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती जामखेड, पोलीस स्टेशन जामखेड, तहसील कार्यालय जामखेड यांना देण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आपल्या स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांना आपण कोविड काळातील 23 हजार रुपये प्रोत्साहन पर मानधन देण्याचे आदेश दिलेले असून देखील ही ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामपंचायत कर्मचायांना अजूनही ती रक्कम मिळालेले नाही व ती रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

तरी आपण आपल्या स्तरावरून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना सूचना देऊन पुढील १० दिवसाच्या आत मध्ये ती रक्कम थेट ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर थेट जमा करण्यात यावी. ही आपणास कळकळीची नम्र विनंती.

तसे नाही केल्यास जामखेड तालुक्यातील सर्व कर्मचारी हे दिनांक-०६/१०/२०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. 

प्रमुख मागण्या
1) ग्रामपंचायत कर्मचारी यांचा राहणीमान भत्ता 2007 पासुन मिळालेला नाही तो आज पर्यंत मिळावा.
2) थकीत रािहलेला भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा 8. 33 % मिळावा
3) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन 25% व 50% दरमहा जमा करण्यात यावी
4) कोिवड काळामध्ये काम केलेले शासन निर्णया नुसार दर महा १००० रुपये प्रमाणे २३ महिन्याचे 23 हजार रुपये मानधन जमा करयात यावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here