जामखेड जिल्हा परिषद गट रचनेबाबत तत्कालीन तहसीलदार यांनी कोणाच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाच्या सूचना पायदळी तुडवल्या – भाजपा कार्यकर्ते

0
1124

जामखेड न्युज—–

जामखेड जिल्हा परिषद गट रचनेबाबत तत्कालीन तहसीलदार यांनी कोणाच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाच्या सूचना पायदळी तुडवल्या – भाजपा कार्यकर्ते

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गट रचना करताना तत्कालीन तहसीलदार गणेश माळी यांनी कोणाचे ऐकून निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देश सूचना व मार्गदर्शक तत्वे पादळीळी तुडवली? असे जामखेड तालुक्यातील भाजपा नेते व कार्यकर्ते रवी (दादा) सुरवसे, वैजिनाथ पाटील, माजी सरपंच ॲड सुभाष जायभाय, सरपंच महारुद्र महारनवर, ऋषिकेश नेहरकर, भारत होडशीळ यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

जामखेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तत्कालीन तहसीलदार यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्देश मार्गदर्शक सूचना धाब्यावर बसवून गट रचना जाहीर केली होती त्यावर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्या होत्या आणि त्यावर माननीय विभागीय आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून भौगोलिक सीमा, नदी, डोंगर, या बाबींचा विचार करून निकाल दिलेला आहे.

जिल्हा परिषदेच्या खर्डा गटामध्ये समाविष्ट केलेले जायभायवाडी, तेलंगशी, धामणगाव, बांधखडक ही गावे 2012 ला व त्यापूर्वी देखील व 2017 मध्ये खर्डा गटात समाविष्ट होते या गावांना पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना, या गावातील विद्यार्थ्यांची शाळा, कॉलेज,आठवडी बाजार, दैनंदिन व्यवहार, दळणवळण हे खर्डा या गावाशी संबंधित असून खर्डा गावच्या जवळ ही गावे आहेत.

साकत व या गावाचे मध्ये डोंगर आहे व अंतर देखील आहे दळणवळण नाही असे असताना तत्कालीन तहसीलदार यांनी कोणाच्या सांगण्यावरून या गावांचा साकत गटामध्ये समावेश केला हा प्रश्न पडतो.

आनंदवाडी हे गाव खर्डा गावाच्या जवळ असून देखील साकत गटात समाविष्ट केले आहे.या गावातील विद्यार्थी शाळेसाठी व कॉलेज साठी खर्डा या ठिकाणी जातात या गावाचा खर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत समावेश आहे, या गावातील रुग्ण हे खर्डा या ठिकाणी हॉस्पिटलला जातात, या गावातील नागरिक आठवडी बाजारासाठी खर्डा या ठिकाणी जातात, दैनंदिन व्यवहार व दळणवळण हे खर्डा गावाशी संबंधित आहे म्हणून या गावचा समावेश खर्डा गटात व्हावा ही हरकत मा.विभागीय आयुक्तांनी फेटाळली आहे.

या आदेशा विरोधात हरकतदार यांनी मा. उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी 4 तारखेला होणार आहे. असे माहिती भाजपाचे रवी दादा सुरवसे, वैजिनाथ पाटील,माजी सरपंच ॲड सुभाष जायभाय, सरपंच महारुद्र महारनवर, ऋषिकेश नेहरकर, भारत होडशीळ यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here