जामखेड वरून हजारो कार्यकर्ते मुंबई च्या दिशेने रवाना
भटके विमुक्त, मुस्लिम व धनगर समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज दि २७ ऑगस्ट रोजी जामखेड वरून हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी मुंबईच्या दिशेने कुच केली आहे.
यावेळी भटके विमुक्त, दलित, मुस्लिम, धनगर समाजाच्या वतीने मुंबईला जाणाऱ्या समाजबांधवांचे स्वागत करण्यात आले व जाहिर पाठिंबा देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जामखेड येथील भटक्या विमुक्तांचा व मुस्लिम समाजाच्या वतीने जामखेड शहरात बॅनर लावुन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
ओबीसीत मराठा समाजाचा समावेश व्हावा यासाठी जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेण्यात आल्या आहेत. गावागावात आर्थिक मदत गोळा केली शिवाय आंदोलकांनी प्रत्येक गावातून किमान तीन चार वाहने काढण्याची तयारी केली आहे. आज 27 रोजी जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या गेटसमोरून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी दलित, भटके विमुक्त, मुस्लिम, धनगर समाजाच्या वतीने स्वागत करत जाहीर पाठिंबा दर्शवला व मुंबई कडे कुच केली.
याच आनुशंगाने मराठा आरक्षण व मंबई येथील मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनाला जामखेड येथील भटक्या विमुक्तांचा व मुस्लिम समाजाच्या वतीने जामखेड शहरात बॅनर लावुन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. जामखेड शहरात देखील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात चलो मुंबईचे बॅनर लावुन सर्वांना मंबई येथिल आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज हजारो बांधवांनी मुंबई च्या दिशेने वाटचाल केली आहे.
बीड रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून भव्य दिव्य वाजत गाजत भगवे झेंडे वाहनांना लावून मिरवणूक विंचरणा नदीजवळ शंकराच्या मुर्ती जवळ आली यावेळी दलित, धनगर, मुस्लिम, भटके विमुक्त जातीतील नेत्यांनी समाजबांधवांचे स्वागत केले व जाहीर पाठिंबा दिला. व आम्ही पण मुंबई ला जात आहोत असे सांगितले.
जामखेड शहर झळकले मोठ्या प्रमाणात बॅनर
चलो मुंबई आंदोलनाची लाट आता ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कोपऱ्यात पोहोचली आहे. जामखेड शहरातील चौका चौकात देखील चलो मुंबई, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण, गरजवंत मराठ्यांचा लढा, २९ ऑगस्ट रोजी भगवं वादळ मंबईत धडकणार अशा नावाने बॅनर झळकले आहेत. हे फक्त बॅनर नसुन मराठा समाजाच्या हक्काची आणि सन्मानाची गर्जना आहे! असे देखील यावेळी मराठा बांधवांन कडुन सांगण्यात येत आहे.