जामखेड येथे बसमध्ये बसताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले, एका महिलेविरोधात गुन्हा दाखल
जामखेड एस टी बस स्टँड याठिकाणी पाहुण्यांना बस मध्ये बसवुन देत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीस गेले. यानंतर प्रवाशांसह बस थेट जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आली. यानंतर बस मधिलच एका महीले विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी महिला सुनंदा सुभाष वायकर वय ४३ वर्षे, रा. निगडी ता.हवेली जि. पुणे या जामखेड येथुन सोमवार दि २५ ऑगस्ट रोजी आपल्या पाहुण्यांना सोडवण्यासाठी जामखेड येथील बस स्थानकात सायंकाळी साडेपाच वाजता आल्या होत्या. यावेळी बस आल्या नंतर फीर्यादी या बस मध्ये पाहुण्यांना बसवुन देण्यासाठी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत आरोपी महीलेने फीर्यादी यांच्या गळ्यातील पाच ग्रॉम वजनाचे ३० हजार रुपये किमतीचे मणिमंगळसुत्र चोरीस गेले.
यानंतर बसमधुन उतरल्यावर लगेचच फिर्यादी यांच्या लक्षात आले की गळ्यातील मणिमंगळसुत्र हे चोरीस गेले आहे. या नंतर फीर्यादी यांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलवुन घेतले. यानंतर एस टी बस थेट जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आली.
गाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होती यामध्ये फिर्यादी सुनंदा वायकर यांच्या सांगण्यावरून बसमध्ये प्रवास करीत असलेल्या आरोपी गवळणबाई फुलचंद काळे, वय ७० वर्षे, रा. उड्डानवडगाव ता. नेकनुर, जिल्हा. बीड हीच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महीलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पो.ना.जितेंद्र सरोदे हे करीत आहेत.
बस स्थानकात चोर्यांचे प्रमाण वाढले
जामखेड एस टी बस स्थानकाच्या नवीन एस टी बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. जुन्या बस स्थानकात कसलाही निवारा नसल्याने सध्या प्रवासी उघड्यावर बसची वाट बघत बसतात.
अनेक वेळा छेडछाडीच्या व चोरीच्या घटना या बस स्थानकात घडत आहेत. आनेक वेळा नागरीक व प्रवाशांनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी केली आहे. मात्र याकडे संबंधित एस टी अगार विभाग कानाडोळा करीत आहेत. त्यामुळेच अज्ञात चोरटे गर्दीचा फायदा घेत महीलांच्या बॅग मधिल दागिने चोरी करीत आहेत. आतातरी एसटी अगार विभागाने याठिकाणी सीसीटीव्हीत कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत.