संजय वराट यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान
विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
शिवपट्टन ग्रामीण विकास मंडळ खर्डा संचलित जिजामाता माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय वराट यांना अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला. यामुळे त्यांच्या वर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने संजय वराट यांना अहिल्यानगर येथे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला यावेळी डॉ. गणपतराव मोरे साहेब (शिक्षण उपसंचालक, पुणे) संध्याताई गायकवाड (जिल्हा शिक्षणाधिकारी), बाळासाहेब बुगे (योजना शिक्षणाधिकारी), दरेकर साहेब (उपशिक्षणाधिकारी),कवळे साहेब (विस्तार अधिकारी), मिरगने साहेब (निरीक्षक) यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जिल्हाअध्यक्ष सुनिल पंडित, कोषाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सचिव मिथुन डोंगरे, माध्यमिक सोसायटी चेअरमन आप्पासाहेब शिंदे, जामखेड तालुका मुख्याध्यापक संघअध्यक्ष दशरथ कोपनर, उपाध्यक्ष दत्ता काळे, सचिव आप्पासाहेब शिरसाठ, प्राचार्य बाळासाहेब पारखे (ल.ना. होशिंग विद्यालय, जामखेड), पी टी. गायकवाड (न्यू इंग्लिश स्कूल, राजुरी), साजिद शेख (भैरवनाथ विद्यालय, हळगाव), गवळी सर (श्री संत नंदराम महाराज विद्यालय, धामणगाव), रत्नपारखे सर (भैरवनाथ विद्यालय, शिऊर), शंकर खताळ (विंचरणा विद्यालय, पिंपरखेड), सुद्रिक सर, राऊत सर (कर्जत) वरील मान्यवर उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना संजय वराट म्हणाले की, हा पुरस्कार केवळ माझा नसून माझे सहकारी शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि कुटुंबाचा आहे. आपल्या सर्वांच्या साथ-सहकार्यामुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे.
शिवपट्टन ग्रामीण विकास मंडळ खर्डा संचलित जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठण येथे १९९६ मध्ये सहशिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. एक विद्यार्थी प्रिय व कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविला तसेच विज्ञान विषयाची आवड निर्माण केली यामुळे विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक विद्यार्थी तालुका व जिल्हा पातळीवर चमकू लागले. प्रत्येकाच्या सुख दू:खात सहभागी होत असतात.
शाळेतील कर्मचारी व लोकसहभागातून शाळेला जागा मिळवून दिली यामुळे आज सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. क्रीडा विभागाकडून २०२१- २२ मध्ये शाळेला वाँल कम्पाउंड साठी सात लाख रुपये मिळवून देण्यात सरांचा मोठा सहभाग होता. अशा विद्यार्थी प्रिय असणाऱ्या संजय वराट यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला आहे.
जिजामाता माध्यमिक हायस्कूल देवदैठण मध्ये २०२१ पासून मुख्याध्यापक म्हणून संजय वराट यांची नियुक्ती झाली. त्यांनी शाळेला गुणवत्ता पुर्ण शिक्षणाचे केंद्र बनविले. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी त्यांनी शाळेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविली. शाळेत पारदर्शक व शिस्तबद्ध कार्यक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात. त्यांनी शाळेत डिजिटल शिक्षणावर भर देत संगणक प्रोजेक्टर इ लर्निंग सुविधा सुरू केली. तसेच पर्यावरण पूरक शिक्षण देण्यावर त्यांचा भर असतो. शाळेच्या गुणवत्तेसाठी ते नेहमीच पालकांशी सुसंवाद साधत असतात.
संजय वराट यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, शिवपट्टन ग्रामीण विकास मंडळ संस्थेच्या अध्यक्षा, सचिव तसेच साकत गटातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ तसेच तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व जिजामाता माध्यमिक हायस्कूल चे विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.