जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
केंद्र सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाचे पुनर्विकास करण्यासाठीत्यांच्या कुटुंबांना देऊ केलेली ४ लाखाची मदत देण्यासाठी तालुकास्तरावर अर्ज स्विकारणे किंवा त्यासंदर्भात इतर कोणतेही काम करण्यासाठी स्वतंत्र अधिका-याची नेमणूक करावी अशी मागणी “भिमटोला” या सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन नियम 2005 नुसार संक्रमणातून कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांना कुटुंब पुनर्विकास करण्यासाठी त्यांच्या कुटुंबांना ४ लाखाची मदत केंद्र सरकारने देण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात “माननीय सर्वोच्च न्यायालयाने” कोरोनाच्या संक्रमणाने मृत्यू झालेल्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत देण्यासंबंधी दोन्ही याचिका दाखल झाल्या होत्या. यामध्ये कोर्टाने कोरोनाने मृत्यू झालेले लोकांच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती अधिनियम 12 (3) नुसार 20 मार्च 2020 नुसार मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिकोषातून किंवा राज्याच्या वतीने देण्यात यावी असा एक आदेश जारी केला आहे. कोरोनामुळे भारतात जवळपास ३ लाख ९ हजार मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये लाखो कुटुंब उध्वस्त झाले आहेत.
यामुळे अनेक कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावली गेला आहे, कोणीची आई, वडील, नवरा, बहिण, भाऊ, मुलगा व अनेक लहान मुले पोरकी झाले आहेत. अनाथ, निराधार झाले आहेत, अनेक महिला विधवा व बेसहारा झाल्या आहेत. त्यांच्यापुढे भविष्याचे संकट उभे राहिले आहे. तरी आपणास कळकळीची विनंती आहे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला दाखल करण्याची एक सारखी कार्यवाही असावी व सर्वांना कुटुंबे पुनर्वसन करण्यासाठी लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
भिमटोला संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाणे, पाटोदाचे माजी सरपंच जोगेंद्र थोरात, संतोष गर्जे, पत्रकार धनराज पवार, विशाल अब्दुले, गणेश घायतडक आदिंच्या सह्या आहेत. आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति तहसीलदार विशाल नाईकवाडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनाही देण्यात आल्या आहेत.






