Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ड्रीम लीग ऑफ इंडिया च्या पोस्टर वर साकत चा शुभम घोडेस्वार ...

ड्रीम लीग ऑफ इंडिया च्या पोस्टर वर साकत चा शुभम घोडेस्वार टेनिस क्रिकेटचा खेळाडू पोस्टर बॉय म्हणून संपूर्ण भारतात चमकला आहे.

0
1390

जामखेड न्युज—–

ड्रीम लीग ऑफ इंडिया च्या पोस्टर वर साकत चा शुभम घोडेस्वार

टेनिस क्रिकेटचा खेळाडू पोस्टर बॉय म्हणून संपूर्ण भारतात चमकला आहे.

ड्रीम लीग ऑफ इंडिया या टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया चे सर्वेसर्वा कन्हैयालाल गुजर सर (अध्यक्ष टी सी ए आय) व मीनाक्षीजी गिरी (सचिव टी सी ए आय) यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या टेनिस क्रिकेट लीग मध्ये संपूर्ण भारतात रजिस्ट्रेशन सुरू आहेत. या लीग चे ब्रँड ॲम्बेसेडर सोन सुद हे आहेत.

अशा मोठ्या लीग च्या पोस्टर वर साकत ता. जामखेड तालुक्यातील खेडेगावचा पण महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चा खेळाडू पोस्टर बॉय म्हणून संपूर्ण भारतात चमकला आहे.

सविस्तर वृत्त असे की पानीपत हरियाणा येथे पार पडलेल्या नॅशनल टेनिस क्रिकेट फेडरेशन च्या स्पर्धेत शुभम घोडेस्वार हा विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करत होता. नॅशनल क्रिकेट मध्ये राज्याचे नेतृत्व करत उकृष्ट कामगिरी नेहमीच केली.

टेनिस क्रिकेट ऑफ इंडिया कडून ड्रीम लीग ऑफ इंडिया या ग्रामीण , होतकरू क्रिकेट पटू ज्यांना स्वतःचे कौशल्य दाखवण्या साठी मोठा देश स्तरावरचा प्लॅटफॉर्म मिळाला नाही अष्या खेळाडूंसाठी मोठी स्पर्धा म्हणजेच लीग क्रिकेट आणले आहे. त्याची ट्रियल नोंदणी dreamleagueindia.com वर सध्या सुरू आहे.

या लीगचे प्रमोशन इंस्टाग्राम , फेसबुक, व्हॉट्सॲप वर सुरू आहेत. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट, जिओ होट स्टार अश्या वेगवेगळ्या ott तथा टीव्ही चॅनल वर होणार आहे.

शुभम घोडेस्वार या उदयोमुख खेळाडू चे मोठ्या लीग मध्ये पोस्टर बॉय म्हणून चमकल्या मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो श्री साकेश्वर विद्यालयात शिकत होता. आता तो अकरावीत शिकत आहे. तो सध्या जामखेड महाविद्यालय येथे डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी मध्ये सराव करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!