Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या अवैध धंद्यांच्या बातम्या प्रसिद्ध होताच काही ठिकाणी मटका पेढ्या बंद तर अद्यापही...

अवैध धंद्यांच्या बातम्या प्रसिद्ध होताच काही ठिकाणी मटका पेढ्या बंद तर अद्यापही काही पेढ्या राजरोसपणे सुरूच

0
826

जामखेड न्युज—–

अवैध धंद्यांच्या बातम्या प्रसिद्ध होताच काही ठिकाणी मटका पेढ्या बंद तर अद्यापही काही पेढ्या राजरोसपणे सुरूच

जामखेड शहरात अवैध धंदे सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच अनेक ठिकाणच्या मटक्याच्या टपऱ्या बंद होत्या मात्र काही ठिकाणी अजूनही राजरोसपणे मटका सुरू आहे. त्यामुळे बातम्या मुळे प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी मटका पेढीवाले प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता मटका घेतच आहेत.

दोन दिवसांपासून कलाकेंद्र नियोजित वेळेत बंद होत आहेत. मात्र कलाकेंद्रात कलेऐवजी डीजेच्या थयथयाट, कर्णकर्कश आवाज सुरूच आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू आहे.

रात्रंदिवस परिसरातील अनेक हाँटेलवर आँनकाँल मुलींना बोलावले जाते. तसेच कलाकेंद्रात संपूर्ण राज्यभरातील हवसे, नवसे, गवसे यांचा राजरोसपणे कलाकेंद्रात वावर असतो. अनेक गुन्हेगार या ठिकाणी आश्रय घेतात. यामुळे गोळीबाराच्या घटना घडतात.

जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे. खुले आम चालू असलेल्या या अवैध धंद्याचा कधी बिमोड होणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. कोणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंद्याना अभय मिळत आहे. हेच खरे कोडे आहे.

शहरातील भुतवडा रोड बाजारतळ वरील सर्व दुकाने बातम्या प्रसिद्धी होताच अवैध मटका धंदे बंद झाले आहे. मात्र तपनेश्वर भागातील कल्याण व मुंबई मटका सकाळ पासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो. अनेकजण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात. कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो. तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो.

मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून अर्थिक गणित बिघडले आहे. जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून गोळीबार सारखे घटना घडत आहेत. हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, दुचाकीचे सायलेंसर काढून मोठ्याने होणारे आवाज, कट मारणे असे प्रकार होत आहेत. अनेक दोन नंबर करणारे व्हॉईट कॉलर जोमात धंदे करीत आहे व यांना आशिर्वाद कोणाचा भेटत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!