हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता पवार घराणे राजकारणाची गुरूकिल्ली – हभप प्रकाश महाराज बोधले

0
430

जामखेड न्युज—–

हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

पवार घराणे राजकारणाची गुरूकिल्ली – हभप प्रकाश महाराज बोधले

प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साकतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सोमवार दि २४ रोजी सुरू झाले होते. यात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच तुकाराम महाराज चरित्र, काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन, हरिपाठ, किर्तन व नंतर गावजेवण व हरिजागर असे भरगच्च कार्यक्रम होते. सप्ताहाची सांगता आज सोमवार ३१ रोजी हभप गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.

 


काल्याच्या कीर्तनासाठी आमदार रोहित पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास वराट, मंगेश आजबे, सुंदरदास बिरंगळ, राजाभाऊ वराट, अभिषेक पाटील, हरीभाऊ मुरूमकर, सागर मुरूमकर, विठ्ठल वराट, अजित वराट, ऋषीकेश पाटील, सचिन वराट यांच्या सह ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काल्याचे किर्तन अध्यक्षीय भाषण असते.
यावेळी त्यांनी काल्याच्या कीर्तनासाठी पुढील प्रमाणे अभंग निवडला होता.


माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥

आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥

घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥

तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥

येथे जमलेल्या खेलगाड्यांपैकी माझे गाड़ी कोण, ते निवडून वेगळे करा आपण आपल्या स्वभावाशि जुळणारे एकत्र येवू व एकमेकांशि खेळु जे जे भक्तिचा खेळ खेळायला घाबरतात, त्यांच्याशी कादिमोड करा, त्याना खेळातून बाहेर काढ़ा

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की, गावात सत्तर वर्षे अखंड वीनावादन ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे. हीच खरी गावाची एकी आहे. आज येथे नतमस्तक होण्यासाठी मीही आलो आहे. गावात आल्यावर कै. हनुमंत पाटील यांची आठवण कायम येते असेही रोहित पवार यांनी सांगितले.


जामखेड तालुक्यातील साकत येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवर्य हभप प्रकाश महाराज बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २४ पासून सुरू झाला होता व आज सोमवार दि. ३१ रोजी सांगता झाली.

सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पुढील प्रमाणे होते
पहाटे ४ ते ६ काकडा भजन,
सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्रनाम,
सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण,
सकाळी १० ते १२ गाथा भजन,
दुपारी ३.३० ते ५ पर्यंत तुकाराम चरित्र,
५.३० ते ६.३० हरिपाठ,
रात्री ७ ते ९ किर्तन व नंतर गावजेवण

गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, हभप माऊली महाराज कोल्हे, काका महाराज निगुडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, गहिनीनाथ सकुंडे, अशोक महाराज सपकाळ व गुरुवर्य रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक मंडळी हजर राहतील.
मृदुंगाचार्य हभप भारत महाराज कोकाटे, हभप प्रमोद महाजन पदमुले, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट, शंकर महाराज माळी, रोहन गवळी, रोहित गवळी दिपक अडसूळ, विक्रम महाराज खुळे, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी, चोपदार आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे होते

सप्ताहासाठी मंडप सौजन्य अनिल साहेबराव वराट इंदोर मध्यप्रदेश यांचे राहिल, फोटो ग्राफर ओम दळवी तसेच जाहिरात सौजन्य कै. ओम अशोक वराट यांच्या स्मरणार्थ अशोक कुंडलीक वराट होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here