Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी हारतुरे न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी पर्यवेक्षक सुरेश...

सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी हारतुरे न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी पर्यवेक्षक सुरेश (भाऊ) वराट यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
365
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयात बसून हार तुरे न घेता शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ठिबक सिंचन संचाची पाहणी करून पिकांबाबत मार्गदर्शन करून कृषी पर्यवेक्षक सुरेश वराट यांनी आपली सेवापूर्ती केली.
         सुरेश वराट यांनी कृषी विभागात 36 वर्षे सेवा केली ते सर्वत्र भाऊ नावाने परिचित होते. सेवेच्या काळात गोरगरीब मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात ते नेहमीच आघाडीवर असत. दुष्काळी परिस्थितीत अनेक कामांना मंजुरी मिळवून अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच ते नगर जिल्हा कृषी विभागाच्या पतसंस्थेचे ते पाच वर्षे संचालक होते व
एक वर्ष चेअरमनही होते. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी ते चौंडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठिबक सिंचन संचाची पाहणी करून पिकांबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले तेव्हा शिंदे यांना कळले की. आज वराट यांचा नोकरीचा शेवटचा दिवस आहे. तेव्हा शिंदे यांनी शेतातच वराट यांचा सत्कार केला.
        कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी सुरेश वराट यांच्याबद्दल सांगितले की, आमच्या कार्यालयात कार्यरत असणारे श्री सुरेश दशरथ वराट कृषी पर्यवेक्षक आज सेवानिवृत्त होत आहेत एक अनुभवी व संयमी व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होत असताना निश्चितच त्यांच्या कार्याची या कार्यालयास उणीव भासेल आज सेवानिवृत्तीच्या दिवशीही त्यांनी सुहास सुभाष शिंदे  चोंडी येथील शेतकऱ्यांची ठिबक सिंचन संच तपासला व आपल्या सेवेची सेवा पूर्ती केली. वराट सुरेश यांचे सेवा निवृत्ती नंतरचे आयुष्य आरोग्यदायी व आनंदी जावो यासाठी माझ्याकडून व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!