ऋतुराज हुलगुंडेची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.
जामखेड येथील ऋतुराज हुलगुंडे ह्याने १४ वर्षाखालील वयोगटातील ३७ किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले. आहे त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय शालेय किक बाॅक्सिंग स्पर्धा दि. १७ व १८ जानेवारी दरम्यान सातारा येथे पार पडल्या. स्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल ४०० खेळाडूंचा सहभाग होता.
स्पर्धेचे उद्घाटन साताऱ्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर, पोलीस निरीक्षक निलेश तांबे व किक बॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले.
स्पर्धेमध्ये जामखेड येथील ऋतुराज हुलगुंडे ह्याने १४ वर्षाखालील वयोगटातील ३७ किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले. त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ऋतुराजला मुख्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर जमदाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सुवर्ण कामगिरीबद्दल विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे साहेब, आमदार रोहित दादा पवार, राघवेंद्र धनगडे, पाटील सर नितीन सर माकोडे सर, संजय काका काशीद, महेश निमोणकर, तात्याराम पोकळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी हुलगंडे यांचे अभिनंदन केले आहे.