जामखेड न्युज——
ईव्हीएम च्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा कट आणि हुकुमशाहीला सुरवात-ॲड.डॉ.अरुण जाधव
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड येथे ईव्हीएम विरोधात जन आंदोलन
ईव्हीएम मशिन हे लोकशाहीच्या विरोधात आहे.लोकशाही आणि भारतीय संविधानाचा गळा घोटणारी प्रक्रिया आहे.देशामध्ये गेली १५ वर्षांपासून ईव्हीएम मशिन बद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून देशातील साहित्यिक, विद्वान तसेच जनतेने एव्हीएम मशिनला विरोध केला आहे.तरी पण हे सरकार नाकारत नाही.ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपरवर येणाऱ्या काळात मतदान घेतले पाहिजे. असे मत ॲड डॉ अरुण जाधव यांनी व्यक्त केले.

ईव्हीएम मशीनच्या विरोधात जन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात होत असून १५ दिवस हे आंदोलन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असून आज दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता जामखेड शहरातील जुने तहसील कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड.डाॅ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जामखेड शहरासह, तालुक्यातील नागरिकांनी ईव्हीएम मशिन बद्दल आपला आक्रोश सह्यांच्या( स्वाक्षरी) माध्यमातून केला.
पुढे बोलताना जाधव म्हणाले की,ज्या देशाने ईव्हीएम मशिन बनवले आहे.तो देश ईव्हीएम मशिनवर मतदान घेत नाही.पंरतु आपला देश ईव्हीएम मशिनवर मतदान घेतोय . बॅलेट पेपरवर मतदान नाही झाले तर या देशात पारतंत्र्याला सुरवात झाली आहे.पुन्हा एकदा या देशात गुलामी येवून मुठभर लोक या देशात कारभार करणार.
यावेळी बोलताना बापूसाहेब ओव्हळ म्हणाले की, ईव्हीएम मशिन ला विरोध का ? तर काही गावांमध्ये मतदान जेवढं मतदान आहे, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मतदान झाले.हे मतदान कोठून आले,हा प्रश्न लोकांना पडला आहे.ईव्हीएम मशिन मध्ये गडबड आहे.ही दडपशाही असून येणाऱ्या काळात हुकुमशाहीकडे वाट धरेल.

यावेळी लोक अधिकार आंदोलन प्रवक्ते बापूसाहेब ओव्हळ,वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे,उपाध्यक्ष भिमराव सुरवसे,उपाध्यक्ष सागर ससाणे,परमेश्वर जमदाडे,सुर्यकांत सदाफुले,अविनाश भोसले,रेश्मा बागवान आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





