अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) गटाला खिंडार जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार

0
89

जामखेड न्युज———-

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) गटाला खिंडार

जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, सोमवारी भाजपामध्ये प्रवेश करणार

 

 

जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत  भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी दि 23 रोजी दुपारी दोन वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री तसेच महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रजी यादव, महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत
जाहिर पक्षप्रवेश होत आहे. यामुळे नगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

अनेक वर्षापासून ते जामखेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करत होते. अडचणीच्या काळात शिवसेनेला साथ देण्याचे काम त्यांनी केले. तरूणांची मोठी फौज त्यांच्या कडे आहे. पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडीकडून रोहित पवार आमदार झाले. पण पाच वर्षांत रोहित पवार यांनी मित्रपक्षाला कधीही विश्वासात घेतले नाही. उलट मित्रपक्षचे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. संजय काशिद हेही खुपच स्वाभीमानी राहिले एकदाही आमदार रोहित पवार यांच्या कडे गेले नाहीत. याउलट आमदार प्रा. राम शिंदे यांनी वेळोवेळी मदत केली.

 

संजय काशिद हे जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात. प्रतिष्ठान मार्फत गडकोट किल्यांची स्वच्छता मोहीम, परिसरातील गुणवंतांचा सत्कार, महिला व मुलींना स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी दरवर्षी शिबीराचे आयोजन करत असतात. परिसरातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा जामखेड भुषण, समाजरत्न, समाजसेवक असे पुरस्कार देऊन सन्मानित करतात. तसेच त्यांची पत्नी रोहिणी काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरात महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे डाँल्बी वर खर्च न करता पारंपरिक वाद्य वाजवत जामखेड शहरात एक आगळीवेगळी विसर्जन मिरवणुक असते तसेच तरूणांना घेऊन गडकिल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवितात. आपल्या समाजकार्याने एक वेगळा ठसा निर्माण करणारे संजय काशिद यांच्या कडे तरूणांची मोठी फौज आहे. हा महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे.

 

आमदार रोहित पवार यांच्यावर कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्वच मित्रपक्ष नाराज आहेत. कर्जत मध्ये ही काँग्रेस व शिवसेना नाराज आहे तर जामखेड तालुक्यातही अनेक नेत्यांनी रोहित पवार यांच्या वर नाराज असल्याचा ठपका ठेवला आहे.

 

ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या नंतर आता शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनीही महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. व भाजपात प्रवेश करणार आहेत.

चौकट

आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक महाविकास आघाडीचे नेते महाविकास आघाडी सोडून चालले आहेत कर्जत मध्ये अनेकांनी भाजपात प्रवेश केला तर जामखेड मध्ये प्रा. मधुकर राळेभात व आता शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनीही महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. व भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. याचे आमदार रोहित पवार यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here