बीड रोडवर साकत फाट्याजवळील रस्ता अपघातात दोन जण गंभीर जखमी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली मदत

0
2737

जामखेड न्युज——

बीड रोडवर साकत फाट्याजवळील रस्ता अपघातात दोन जण गंभीर जखमी,

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली मदत

 

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिंमेट रस्ता एका बाजूने तयार आहे तर काही ठिकाणी मुरूम व मातीमुळे पाऊस आला की, गाड्या घसरून अनेक अपघात होतात. साकत फाट्याजवळील हाॅटेल रघुनंदन जवळ मोटारसायकल घसरून दोघेही जबर जखमी झाले होते.

अपघाताची माहिती मिळतात रात्री नऊ च्या आसपास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वतः ची रुग्णवाहिका घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेश फाळके आणि बाबू फाळके यांना दवाखान्यात दाखल केले प्राथमिक उपचार घेऊन नगरला पाठवले आहे.


जामखेड येथील बीड रोडवरील रघुनंदन हॉटेल जवळ अपघात झाला असून दोन जण जखमी आहेत ताबडतोब जखमींना आणून दवाखान्यात ऍडमिट करा सदर बातमी ऐकताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे आपली रुग्णवाहिका घेऊन जोडीदार सचिन खामकर ला घेऊन घटना स्थळावरील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन जखमी मोटर सायकल वरून पडून नामे गणेश फाळके आणि बाबू फाळके मुक्काम पोस्ट फाळकेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांना आणून दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना ताबडतोब नगरला पाठवण्यात आले आहे.


महत्त्वाचे म्हणजे बीड रोडला रोडचे अपूर्ण काम असल्यामुळे बरेच अपघात होत आहेत यामध्ये बऱ्याच जणांचे प्राण गेले असून कुणाचे हात मोडले तर कोणाचे पाय मोडले आहेत याकडे कोणी लक्ष देईल का आणि काम कधी होणार अशी खंत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केली.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here