ॲड.डॉ.अरुण जाधव यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार जाहीर जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
627

जामखेड न्युज——

ॲड.डॉ.अरुण जाधव यांना दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार जाहीर

जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

ग्रामीण विकास केंद्र जामखेड संस्थेनचे संस्थापक/अध्यक्ष मा. ॲड.डॉ.अरुणा (आबा) जाधव यांना पुणे येथील दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

अनाथ,निराधार,वंचित, दलित,आदिवासी, लोककलावंत, भटके-विमुक्त तसेच निवारा बालगृहाच्या माध्यमातून ८५ मुलांचे शिक्षण व संगोपन करणारे ॲड.डॉ. अरुण जाधव यांना पुणे येथील दादा कोंडके मेमो फाउंडेशन श्रद्धेय दादा कोंडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार’ २०२४ दिनांक २६ ऑगस्ट २०२४ वार सोमवार रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉक्टर श्रीपाल सबनीस व प्रमुख पाहुणे राजेंद्र पवार (मुख्य अभियंता महावितरण पुणे परिमंडळ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती दादा कोंडके मेमो फौंडेशनचे प्रमुख मनोहर कोलते सर यांनी दिली.

ॲड डॉ अरुण जाधव यांच्या कार्याची‌ ख्याती राज्यभर आहे.उपेक्षित वर्गांसाठी गेली ३१ वर्ष न थकत, न थांबता मान – अपमान सहन करुन येणाऱ्या संकटांना झेलत, स्वतः चा जीव धोक्यात घालून उपेक्षित वर्गांसाठी त्यांच्या हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी राज्यभर व भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जाऊन उपेक्षित वर्गाचा लढा उभा करण्याचं काम करीत आहेत.या कामाची देशात व परदेशात वेगवेगळ्या माध्यमातून माहिती घेऊन अनेक सामाजिक संस्था व संघटना आबांच्या कामाचे कौतुक करत आहेत व अरुण आबा यांना लढण्यासाठी बळ देत आहेत.

महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये मॅगसेसे पुरस्कर्ते डॉ रजनीकांत आरोळे यांच्यानंतर ॲड डॉ अरुण (आबा) जाधव यांचा नंबर लागतो ‌.खरं तर आरोळे साहेब मानसपूत्र समजत होते.सतत गोरगरीब व कष्टकरी यांच्यासाठी निस्वार्थी पणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान निश्चित होतो.याच महिन्यांमध्ये दोन पुरस्कार आबांना जाहीर झाले आहेत.पुणे येथील मानाचा पुरस्कार कै.तात्यासाहेब देशमुख व मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हे सर्व यश ॲड डॉ अरुण जाधव यांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना जाते.या पुरस्कारामुळे जामखेड तालुक्यांचं नाव राज्यभर गाजत आहे.महाराष्ट्रातील संस्था, संघटना, साहित्यीक , विचारवंत, पत्रकार, राजकीय नेते, सामाजिक चळवळीतले प्रमुख फोन, मेसेज द्वारे अभिनंदनाचा वर्षाव करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here