जामखेड न्युज——
राष्ट्रवादी कॉग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष पदी संध्याताई सोनवणे
जामखेड तालुक्यातील नायगाव च्या ग्रामपंचायत सदस्य ते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष असा संध्याताई सोनवणे यांचा प्रवास आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या आरोग्यासाठी जनजागृती तसेच विविध उपक्रम याचबरोबर विविध उत्सव तसेच महापुरुषांच्या सार्वजनिक जंयती उत्सव, शाळा काॅलेज मधील मुलींसाठी विविध आरोग्य विषयक उपक्रम असे विविध कार्यक्रम सध्याताई सोनवणे यांनी राबवले.
पुण्यात विद्यार्थी, विद्यार्थ्यींनीसाठी विविध आंदोलने करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला आहे याच कामाची पावती म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याताई सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती चे पत्र देण्यात आले आहे.
संध्याताई सोनवणे यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
महागाई, वाढती बेरोजगारी याबाबत त्यांची पुण्यातील आंदोलने मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील एका युवतीने प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मजल मारलेली आहे.