जामखेड न्युज———
जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
जामखेड शहरातील तपनेश्वर परीसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्यास कारणीभूत असल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तेलंगशी येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीची छेडछाड व तीने आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे दोघे. रा. तेलंगशी ता. जामखेड आशा दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत अल्पवयीन मुलगी ही तेलंगशी येथील तिच्या मामाकडे शिक्षणासाठी राहात होती तर तीचे माध्यमिक शिक्षण खर्डा याठिकाणी झाले आहे.
ती इयत्ता १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मामाकडे शिक्षण घेत आसतानाच तेलंगशी गावातील आरोपी शरद हनुमंत ढाळे हा तीला वेळोवेळी त्रास देऊन छेडछाछ करीत होता. तर त्याचा चुलत भाऊ महादेव विष्णु ढाळे हा मुलीला पळवुन घेऊन जा आसे सांगत होता.
मुलीला संबधित आरोपी त्रास देत असल्याने वडिलांनी तीला पुणे येथील तीच्या मोठ्या बहिणीकडे राहण्यास पाठवले होते. मात्र तरी देखील संबधित आरोपी हे पुणे येथे मुलगी राहत आसलेल्या ठिकाणी येऊन त्रास देत होते. त्यामुळे सदर मुलीस पुन्हा जामखेड येथे आपल्या आई वडिलांकडे आणण्यात आले होते.
यावेळी मुलगी ही मानसीक टेन्शनमध्ये होती. सोमवार दि ४ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता मुलीचे वडील बाहेर कामाला गेले होते तर तीची आई घराच्या बाहेर भांडी घासत होती. यावेळी पिडीत अल्पवयीन मुलीने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यानंतर मयत मुलीच्या बहीणीला आपल्या लहान बहीनीने आत्महत्या करण्याच्या काही दिवस आगोदर पुणे येथे आपल्या घरी एका वहीत चिठ्ठी लिहुन ठेवली आसल्याचे आढळून आले आहे. या चिठ्ठी मध्ये माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर यास शरद ढाळे हा जबाबदार आसेल असे लिहुन ठेवले होते.
तसेच संबधित आरोपी देखील तीला त्रास देत आसल्याने पिडीत मुलीच्या वडिलांनी काल दि ४ मार्च रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे. दोघे रा. तेलंगशी ता. जामखेड आशा दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महतेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.