रविंद्र कोठारी यांना रासपची नगर दक्षिणेची लोकसभेची उमेदवारी जाहीर जामखेड मध्ये रासपची बुथ कमिटी मिटिंग संपन्न

0
155

जामखेड न्युज——

रविंद्र कोठारी यांना रासपची नगर दक्षिणेची लोकसभेची उमेदवारी जाहीर

जामखेड मध्ये रासपची बुथ कमिटी मिटिंग संपन्न

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रासपने अहमदनगर दक्षिण साठी रविंद्र (भाऊ) कोठारी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बुथ कमिटी सदस्यांची बैठक तालुकावार घेण्यात आली. तसेच दि २० रोजी राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नगर येथे होणाऱ्या बुथ कमिटी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

जामखेड मध्ये आज दि. ८ रोजी रासप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बुथ कमिटी सदस्यांची बैठक संपन्न झाली यावेळी रविंद्र भाऊ कोठारी प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य, भानुदास हाके राज्य कार्यकारीणी सदस्य, विकास मासाळ युवक जिल्हाध्यक्ष, संजय खरात जिल्हा सरचिटणीस रासप, डॉ. प्रकाश कारंडे मा. जामखेड तालुकाध्यक्ष रासपा, अँड मोहन कारंडे रासप नेते, प्रा. अमोल क्षिरसागर रासप कर्जत शहराध्यक्ष, सदाशिव हजारे रासप नेते, नंदू खरात युवक तालुकाध्यक्ष रासप जामखेड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रासपचे लोकसभेचे उमेदवार रविंद्र कोठारी म्हणाले की, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांनी माझी नगर दक्षिण मधुन उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानिमित्ताने दि. २० रोजी नगर येथे लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत बुथ कमिटी मिटिंग संपन्न होणार आहे. जानकर साहेबांचे मार्गदर्शन लाभणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व बुथ कमिटी सदस्य व कार्यकर्त्यांची उपस्थित राहावे असे आवाहन केले.

नगर दक्षिण मध्ये २०२० बुथ आहेत. या सर्वांनी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थित राहावे असेही सांगितले.

यावेळी डॉ. प्रकाश कारंडे जामखेड तालुकाध्यक्ष रासप यांनी बोलताना सांगितले की, राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब आपणास मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्व बुथ कमिटी प्रमुखांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

रासप युवक तालुकाध्यक्ष नंदू खरात यांनी सांगितले की, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेबांचे युवकांना अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे तेव्हा तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here