जामखेड न्युज——
दत्तात्रय राऊत यांना दैनिक गावकरी समुहाचा स्टार पत्रकार पुरस्कार प्रदान
दैनिक गावकरी समुहाचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार या नावाचा पुरस्कार जामखेड येथील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांना शिर्डी येथे आयोजित पत्रकार स्नेह संमेलनात प्रदान करण्यात आला.
दैनिक समर्थ गावकरी चे मुख्य संपादक मा. डॉक्टर विश्वासराव आरोटे. कार्यकारी संपादक. जाधव साहेब. ठाणे जिल्हा आवृत्ती चे संपादक श्री चव्हाण साहेब. श्री सागर दोलतडे. समुह संपादक. व समाज कल्याण परिषद. सदस्य. केंद्र सरकार…या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी राज्य भरातून पत्रकार आले होते.
ज्या पत्रकारांने वर्षभरात. विविध क्षेत्रातील घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला. त्या संबधी बातम्या संकलीत केल्या. वृतपत्रा कडे प्रसिद्धी साठी पाठवल्या. समाजातील सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हातभार लावला.
सामाजिक… शैक्षणिक.. धार्मिक.. क्रिडा.. आरोग्य.. शासकीय कार्यालयाचे उपक्रम.. शासकीय योजना.. संस्था मार्फत केले जाणारे उपक्रम. एका व्यक्तीने केलेले उपक्रम..
जनते समोर आणने.. समाजातील घटकांचा परामर्श घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवनयाचे काम ज्या पत्रकारांने वर्षे भरात केले आहे. कशा पत्रकारांस वरील *स्टार पत्रकार *हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. असा हा पुरस्कार जामखेड येथील जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांना शिर्डी येथे आयोजित पत्रकार स्नेह संमेलनात प्रदान करण्यात आला.
पत्रकार दत्तात्रय राऊत हेसन १९९२ पासून पत्रकारीता क्षेत्रात काम करत आहेत. प्रथम दैनिक. देवगिरी तरूण भारत. या वृत्तपत्रात काम केले. त्या नंतर दै. सामना… दै. चंपावती. या मधे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केलेले आहे. तसेच जामखेड शहरामध्ये.. साप्ताहिक जयहिंद टाईम्स… या साप्ताहिकामधे कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले आहे. या साप्ताहिकाचे मुख्य संपादक म्हणून फायक अली सय्यद यांनी काम केले होते. हे साप्ताहिक या दोघांनी सलग चार वर्षे प्रसिद्ध केले होते. खंड न पडू देता हे साप्ताहिक चालविले.. पत्रकार दत्तात्रय राऊत हे गेली तिन वर्षापासून दै. गावकरी मधे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.
पत्रकार राऊत यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातून तालुक्यातुन अभिनंदन होत आहे. पत्रकारीता क्षेत्रात. मैलाचा दगड ठरणार आहे. तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….