जामखेड न्युज——
जामखेड- जवळा रोडवर अपघातांची मालिका दररोज सुरूच, एकाच आठवड्यात पाच अपघात
जवळा जवळील पूलाला कठडा व धोका असल्याचा सूचना फलक नसल्याने अनेक मोटर सायकल स्वार- चार चाकी गाड्या थेट ओढ्यात जात असल्याने अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अशाप्रकारे वार शनिवार रोजी मोटर सायकल स्वराचा अपघात होऊन जखमी झाले. जवळा येथील पूलावर नित्याचेच अपघात होत आहेत. जामखेड करमाळा रोडवर असे बिगर कठड्याचे चार ते पाच पूल आहेत.
तसेच जामखेड – जवळा काही ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. खडीकरण झाल्यावर रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर मोकळी खडी टाकलेली असल्याने वाहन चालकांचा वेग कंट्रोल करताना वाहन घसरून थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर आदळत असल्याने मोठे अपघात झाले आहेत. एकाच आठवड्यात चार ते पाच अपघात झाले आहेत.
जामखेड जवळा रोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच गतिरोधक असलेल्या ठिकाणी ,व वळण रस्त्यावर सूचनाफलक नसल्याने वाहन चालकांना धोक्याचा अंदाज येत नसल्याने दररोज अपघात होत आहे. यामुळे जामखेड जवळा रोड मृत्यूचा सापळा बनला आहे