जामखेड न्युज——
आमदार प्रा. राम शिंदे व राजेश मोरे यांचा वाढदिवस निवारा बालगृहात साजर
माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे तसेच दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे यांनी सामाजिक भावनेतून आपला वाढदिवस मोहा येथील निवारा बालगृहातील मुलांसोबत साजरा केला. यावेळी निवारा बालगृहातील मुलांना मिठाई व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप केले.
यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांच्या पंचावन्न व्या वाढदिवसानिमित्त पंचावन्न दिवे लावण्यात आले व आमदार शिंदे व राजेश मोरे यांचे औक्षण करण्यात आले व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम ऋषिकेश मोरे मित्र मंडळाने आयोजित केला होता तेथील मुलांना ऋषिकेश मोरे यांनी संपूर्ण रोजच्या दैनंदिन जीवनात लागणार्या वस्तूंचे वाटप केले.
सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे. निवारा बालगृहातील मुलांचे थंडी पासून संरक्षण व्हावे म्हणून हर्षल डांगर यांनी रग वाटप केले.
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, अरणगावचे उसरपंच लहु शिंदे, नगरसेवक बिभीषण धनवडे, अमित चिंतामणी, प्रवीण सानप यांच्या सह सौ. वर्षा मोरे व त्यांचा स्वरांगणी गृप व नातेवाईक परीवारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
परिसरातील कोल्हाटी, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड मजूर, वीटभट्टीमजूर, भटक्या- विमुक्तांच्या पाल्यांसाठी मोहा (ता.जामखेड) येथे निवारा बालगृहात सुमारे शंभरच्या आसपास मुले आहेत या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची सोय मोफत केली जाते. अनेक लोक आपला वाढदिवस तेथील चिमुकल्या सोबत साजरा करतात दानशूर व्यक्तींच्या मदतीवर हे पवित्र काम अँड डॉ. अरूण जाधव करत आहेत. हे काम प्रत्यक्ष पाहून अनेकांना मदत करावी अशी भावना होते. अनेक गोरगरीब व वंचित विद्यार्थ्यांचे पालकत्व अँड डॉ. अरूण जाधव यांनी स्विकारले आहे.