विकासाच्या मुद्द्यावर तसेच सर्वसमावेशक उमेदवारांमुळे शेतकरी ग्रामविकास आघाडी प्रचंड बहुमताने जिंकणारच – डॉ. दीपक वाळुंजकर

0
205

जामखेड न्युज——

विकासाच्या मुद्द्यावर तसेच सर्वसमावेशक उमेदवारांमुळे शेतकरी ग्रामविकास आघाडी प्रचंड बहुमताने जिंकणारच – डॉ. दीपक वाळुंजकर

 

जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ता माझ्याच घरात हवी असे काहींना वाटते गावच्या विकासाचे काहिही होवो म्हणून तालुक्याचे पंचायत समिती सभापती पद उपभोगून गावात सोसायटी व ग्रामपंचायत मध्ये परत घरात सत्ता हवी असे काहींना वाटते जवळ्याची जनता त्यांना माफ करणार नाहीत त्यांच्या कडे कसलेही विकासाचे व्हिजन नाही. शेतकरी ग्रामविकास आघाडी विकासाचे व्हिजन घेऊन मैदानात उतरले आहे. सर्वच उमेदवार सर्वसमावेशक व जनतेच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे आहेत यामुळे विजय निश्चित आहे असे मत डॉ दीपक वाळुंजकर यांनी व्यक्त केले.

 

जवळागावच्या विकासासाठी लोकनेते स्व. श्रीरंगभाऊ कोल्हे, स्व.किसनराव दळवी व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या पॅनेलने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन सर्व समावेशक शेतकरी ग्रामविकास आघाडी पँनल बनवला आहे. विकासाचा अजेंडा घेऊन मतदारापुढे जात आहेत. आता हि निवडणूक मतदारांनीच हातात घेतली आहे त्यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे असे मत डॉ. दिपक वाळुंजकर यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.


मागील पाच वर्षांत जवळा विकासाबाबत मागे गेला आहे. गावचा कसलाही विकास केला नाही. यामुळे जनतेच्या मनात रोष आहे हाच रोष मतदानाच्या रूपाने मतदार व्यक्त करत शेतकरी ग्रामविकास आघाडीबरोबर येत आहेत यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असेही डॉ. वाळुंजकर यांनी सांगितले.

शेतकरी ग्रामविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन, आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ.पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार, राजू मोटे, पांडुरंग वाळके, दयानंद कथले, आयुब शेख, हुसेन सय्यद, सत्तार भाऊसाहेब यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत.

यावेळी उमेदवार नय्युम शेख व अशोक पठाडे यांनी आपले मनोगते व्यक्त करताना म्हणाले की. जे पाच वर्षानंतर आता मतदारांच्या पाया पडायला आलेत पाच वर्षे कुठे होते. यामुळे जनता त्यांना त्यांची जागा दाखविणार आहे. तसेच शेतकरी ग्रामविकास आघाडीचे सर्वच उमेदवार आपल्या कामांसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत.


मागच्या वेळी जेष्ठांच्या सांगण्यावरून ज्यांना संधी दिली होती. त्यांनी सत्ता हाती येताच मनमानी कारभार केला. पाच वर्षांत पक्ष बदलत फक्त सत्ता जपली. गावचा कसलाही विकास झाला नाही याचाच राग मतदारांच्या मनात आहे तो मतदानाच्या रूपाने व्यक्त करत शेतकरी ग्रामविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here