जामखेड न्युज——
बरोबरचे लोक का सोडून गेले याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे – दयानंद कथले
शेतकरी ग्रामविकास आघाडीचा बहुमताने विजय निश्चित

मागील पाच वर्षांत जवळा गावातील सर्व जुने जाणते लोक बरोबर होते. सर्वांनी मिळून सत्तेवर बसवले होते. पण पाच वर्षांत मनमानी कारभार करत ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतले नाही. गावचा कसलाही विकास केला नाही. स्वतः ठेकेदारी करत स्वतः चे घर भरले. मागील पाच वर्षांत बरोबर असणारे आता बरोबर राहिले नाहीत याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवणाऱ्या शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. असे मत दयानंद कथले यांनी सांगितले.

जवळा ग्रामपंचायत निवडणूकीत जवळा गावातील शेतकरी ग्रामविकास आघाडी जोमात असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा सुरू झाली आहे. जवळा गावाच्या जडणघडणीत कै. श्रीरंग कोल्हे, किसनराव दळवी, प्रदीप आबा पाटील यांनी दिलेले मोठे योगदान ग्रामस्थांच्या मनामध्ये कायम आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वारसदार जवळा गावातील सर्व समाजाशी सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत. विकासाचे स्वप्न घेऊन शेतकरी ग्रामविकास आघाडी स्थापन केली आहे.

शेतकरी ग्रामविकास आघाडी मार्गदर्शक म्हणून
दत्तात्रय कोल्हे, प्रदिप दळवी, राजू महाजन,
आर. डी. पवार, आजीनाथ हजारे, डॉ. पवार, दिपक पाटील, राजू राऊत, शहाजी पाटील पवार, सत्तार भाऊसाहेब, राजू मोटे, पांडुरंग वाळके, दयानंद कथले, आयुब शेख, हुसेन सय्यद यांच्या सह अनेक ज्येष्ठ ग्रामस्थ काम करत आहेत.

सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार सर्वांभिमूख असलेले चेहरे असुन जवळा गावात आपल्या कामाने व समाजातील प्रत्येक घटकातील माणसांबरोबर सलोख्याचे संबंध असलेले सरपंचपदाचे उमेदवार बाळासाहेब श्रावण आव्हाड तर सदस्यपदासाठी पांडुरंग उध्दव शिंदे, प्रदिप किसनराव दळवी, सौ दिक्षा सूरज कांबळे, संतराम आदिनाथ सुळ, रूपाली राहूल लोंढे, रोहिणी दत्तात्रय वाळुंजकर, किसन दत्तात्रय सरोदे, प्रशांत भाऊसाहेब पवार, सिताबाई रामभाऊ पठाडे, दशरथ यदु हजारे, पूजा उमेश रोडे, सोनाली गौतम कोल्हे, नय्युम अस्लम शेख, ठकुबाई साधू हजारे, दैवशाला उमेश हजारे हे शेतकरी ग्रामविकास आघाडी जवळा पँनलने दिलेले उमेदवार लोकाभिमुख असुन प्रामाणिकपणाच्या कसोटीला उतरणारे आहेत असे ग्रामस्थ चर्चेतून ऐकायला मिळत आहे.
विरोधकांनी जे फोटो छापले आहेत त्यांचे वारसदार आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.









