धनगर आरक्षणासाठी उपोषणाच्या विसाव्या दिवशी राज्यभरातून वाढता पाठिंबा, मुख्यमंत्र्यांची फोनवर विचारपूस, उद्या मंत्री गिरीश महाजन चौंडीत येणार ?

0
354

जामखेड न्युज——

धनगर आरक्षणासाठी उपोषणाच्या विसाव्या दिवशी राज्यभरातून वाढता पाठिंबा, मुख्यमंत्र्यांची फोनवर विचारपूस, उद्या मंत्री गिरीश महाजन चौंडीत येणार ?

धनगर आरक्षणासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे उपोषण सुरु आहे. आज उपोषणचा विसावा दिवस आहे. आज राज्यभरातून अनेकांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच उद्या एकविसाव्या दिवशी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन हे येत आहेत अशी माहिती अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे यांनी दिली.

आज उपोषणाच्या विसाव्या दिवशी जालन्याचे आमदार नारायण कुचे, आमदार प्रा. राम शिंदे, विश्वासनाना देवकाते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचे चिरंजीव दिग्विजय नागवडे, परमेश्वर कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर यांच्या सह अनेकांनी भेट दिली व जाहिर पाठिंबा व्यक्त केला.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर विचारपूस करत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले उद्या शासनाच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे उपोषण कर्त्यांशी चर्चा करण्यासाठी येत आहेत. उद्या उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी काही तरी मार्ग निघण्याची शक्यता आहे.

काल रविवारी उपोषणाला बसलेल्या बापाची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सुरेश बंडगर यांची मुलगी प्रतिक्षा बंडगर चौंडी येथे उपोषण स्थळी आली असता कशी आहे तब्येत, तब्येतीची काळजी घ्या. हुंदका देत मुलीने टाहो फोडला होता. मोठे भावनिक वातावरण झाले होते.

प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने सरकारने धनगर आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊन लवकरात समाजाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंतसेनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या २० दिवसापासून उपोषण सुरू आहे.

धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने मुंबईत बैठक घेतली पण ठोस निर्णय घेतला नाही. उद्या पासून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती यानुसार उद्या शासनाने प्रतिनिधी गिरीश महाजन हे चौंडी येथे उपोषण स्थळी येत आहेत अशी माहिती अक्षय शिंदे यांनी दिली.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here