ल.ना.होशिंग जुनियर कॉलेज मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0
161

जामखेड न्युज——

ल.ना.होशिंग जुनियर कॉलेज मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

 

ल. ना. होशिंग ज्युनियर काँलेज मध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी संपुर्ण दिवसभर शाळेचे कामकाज सांभाळले प्राध्यापकांची भुमिका हुबेहूब वटवली शिकवणारे विद्यार्थी शिक्षक व शिकणारे विद्यार्थी यांनी या सर्व शिक्षक दिनाचा अतिशय छान अनुभव घेतला.

मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. ल.ना.होशिंग जूनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय अरुणशेठ चिंतामणी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सदानंद होशिंग व प्रमुख उपस्थिती संस्थेचे खजिनदार राजेश मोरे व संचालक सैफुल्ला खान, प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे उपस्थित होते.

शिक्षक दिनाच्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव आला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून भूमिका केली या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातीलही भूमिका जबाबदारीने विद्यार्थ्यांनी पार पाडल्या. पाच सप्टेंबर या दिवशी सर्व शाळा विद्यार्थी शिक्षकांनी अतिशय व्यवस्थित चालवली. शिकवणारे विद्यार्थी शिक्षक व शिकणारे विद्यार्थी यांनी या सर्व शिक्षक दिनाचा अतिशय छान अनुभव घेतला.


सकाळी 7.15 ते 11:45 या वेळेमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन व मनोगताचा सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे उपप्राचार्य श्री पोपट जरे सर यांनी केले. त्यानंतर कॉलेजचे प्राचार्य श्री श्रीकांत होशिंग सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी काम केले त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्या सर्व विद्यार्थ्यांना कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

दिवसभरात शिक्षक विद्यार्थी यांना आलेले अनुभव विद्यार्थी शिक्षकांनआलेले अनुभव विद्यार्थी शिक्षक यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले. त्या मनोगतामध्ये शिक्षकांप्रती आदरयुक्त विद्यार्थ्यांच्या भावना भाषणांमधून व्यक्त होत होत्या हेच शिक्षक दिनाचे मोठं फलित होय.

प्रमुख उपस्थिती श्री सदानंद होशिंग यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास,शिस्त यावर सुंदर असे मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण काका चिंतामणी साहेब यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे माजी विद्यार्थी बसरवाडी शाळेवरील एकनाथ चव्हाण यांना अहमदनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका स्वाती सरडे, कु. भिसे व कु बांबरसे यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापिका योगिता भोईटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here