जामखेड न्युज——
लक्ष्मी पवार यांचे सामाजिक कार्ये कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
भटक्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच अनेकांना जातीचे दाखले मिळवून दिले
जामखेड तालुक्यातील जनविकास सेवाभावी संस्था मार्फत श्रीमती लक्ष्मी पवार या भटक्या समाजातील लोकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक व शैक्षणीक काम करत आहेत .त्यांचे काम हे समाजासाठी कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले आहे.
जनविकास सेवाभावी संस्थाच्या वतीने जामखेड येथे भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. भटक्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्न करीत असून त्यांनी पारधी समाजातील अनेक मुलांचे जातीचे दाखले काढले असून त्यांना नेहमी अधार देण्याचे काम करत आहे. त्यांनी त्यांचे स्वतः च्या मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात आदर्श निर्माण केला आहे. ही अभिमानाची बाब आहे .
यावेळी श्रीमती लक्ष्मी पवार, राम पवार, उपेंद्र आढाव, अर्चना भोसले, विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.