जामखेड न्युज——
बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी – सभापती शरद कार्ले
पावसाळा सुरू होऊनही बरेच पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या मात्र आता सर्वत्र पाऊस सुरू झाल्याने लवकरचं पेरणीला सुरवात होईलं. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी खते बी-बियाणे खरेदी करताना चांगल्या प्रतीचे खरेदी करावेत, बोगस बियाण्यांची पेरणी होणार नाही शेतक-यांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन जामखेड बाजार समितीचे सभापती पै. शरद पंडीत कार्ले केले आहे.
तसेच खते, बी-बियाणे खरेदी करताना काही अडचणी येत असतील तर तालुका कृषी अधिकारी जामखेड यांच्याशी संपर्क करावा.
तालुका कृषी अधिकारी
राजेंद्र सुपेकर : 9422233148.
पंचायत समिती कृषी अधिकारी
अशोक शेळके : 7588542624
चौकट
‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतील शब्दांचा पुन्हा-पुन्हा विचार करावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. केवळ चांगल्या दर्जाचे बियाणे नसल्यामुळे शेतीतील उत्पादनात सध्या मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. जामखेड तालुक्यातील सर्व कृषीकेंद्र चालकांना विनंती आहे शेतकरी बांधवांना सहकार्य करून, चांगल्या प्रतिचे खते,बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत.
शरद कार्ले – सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड