जामखेड न्युज——
बकरी ईद व आषाढी एकादशी साठी जामखेड पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शक सूचना
आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करता दुसऱ्या दिवशी करणार – मौलाना खलील
येत्या गुरुवारी आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण एकाच दिवशी येत आहेत यानिमित्ताने शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मुस्लिम समाजातील प्रमुखांबरोबर बैठक घेतली व मार्गदर्शक सूचनांविषयी सांगितले यावेळी आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते मुस्लिम समुदायाने घेतला.
जामखेड पोलीस स्टेशन दिनांक-24/06/2023 रोजी 19-30 ते 20-30 वाजता जामखेड पोलीस स्टेशन येथे मस्जिद चे सर्व मौलाना, बकरी ईद साजरे करणारे कुरेशी लोक यांची बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मीटिंग घेण्यात आली आहे.
1) बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये.
2)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
3) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही
4) सध्या सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.
या अनुषंगाने मौलाना खलील यांनी सांगितले की, आम्ही आषाढी एकादशी दिवशी बकऱ्यांची कुर्बानी न देता ती दुसऱ्या दिवशी देऊ असे सांगितले आहे त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते झाला आहे. वरील सर्व सूचना त्यांना बकरी ईदच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या आहेत. मिटींगला मौलाना , कुरेशी लोक ,व इतर असे 15 लोक हजर होते.
महेश पाटील पोलीस निरीक्षक जामखेड पोलीस स्टेशन