काबाडकष्टाने दगडाला पाझर फोडणाऱ्या वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक – अँड डॉ. अरूण जाधव सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते वडार समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन

0
220

जामखेड न्युज——
काबाडकष्टाने दगडाला पाझर फोडणाऱ्या वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक – अँड डॉ. अरूण जाधव

सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते वडार समाजाच्या कार्यालयाचे उद्घाटन

दगडाला घडवून त्याला देव पण देणाऱ्या व हाताला फोड येईपर्यंत दररोज कष्ट करणाऱ्या वडार समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक अँड डॉ.अरुण जाधव यांनी खर्डा येथे व्यक्त केले.

यावेळी भाजपा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख रवी सुरवसे, सरपंच वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,माजी सरपंच आसाराम गोपाळघरे,संजय गोपाळघरे,महिला काँग्रेसच्या ज्योतीताई गोलेकर, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे, उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले, सुनील साळुंखे, बिबीशन चौगुले, विलासशेठ खिवंसरा, हनुमंत कातोरे, भागवत सुरवसे, राजू डोके, कल्याण सुरवसे, दत्तात्रय भोसले,बाजीराव गोपाळघरे,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील, दादा जमकावळे,महालिंग कोरे, राजू मोरे, गणेश शिंदे, दादा जावळे, योगेश सुरवसे, इत्यादी उपस्थित होते.

अँड. जाधव बोलताना पुढे म्हणाले की, समाजातील भटक्या जमातीत असणारी आमच्या अठरापगड जातीला छत्रपती शाहू महाराजांनी न्याय देण्याचे काम केले आहे. शब्दाला पक्क्या असणाऱ्या आमच्या भटक्या जाती असून आमच्याबरोबर सावड केली तर ती सावड आम्ही पूर्णच करणारे आहोत, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आम्हाला बरोबर घेऊन चलावेच लागेल.खर्डा येथील वडार समाज हा धार्मिक प्रवृत्तीचा असून अनेक सामाजिक उपक्रम येथील जय बजरंग तरुण मंडळांनी केलेले आहेत, त्याचबरोबर येथील नवरात्र उत्सव ही पाहण्यासारखा असतो येथील समाजातील लोक हे गवंडी काम,दगड फोडणे, ठेकेदारी,कॉन्ट्रॅक्टदार व इतर व्यवसायही या समाजातील मुले आज करीत असल्याने या समाजाने प्रगती मध्ये मोठी झेप घेतली आहे, सर्व कार्यकर्ते दिवसभर काम करून संध्याकाळी एकत्र येतात त्यांना बसण्यासाठी सुंदर अशा कार्यालयाची गरज होती ती आज पूर्ण झाली आहे. वडार समाजाच्या पाठीमागे येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी उभे राहून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे असे आवाहन शेवटी अँड अरुण जाधव यांनी केले.

यावेळी विजयसिंह गोलेकर, रवी सुरवसे, सरपंच वैजीनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ यांचा सत्कार वडार समाजाचे अध्यक्ष बबलू सुरवसे उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले यांनी केला.तसेच माजी अध्यक्ष बिबीशन चौगुले उपाध्यक्ष कांतीलाल डोके यांचाही चांगले काम केल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ हे बोलताना म्हणाले की, खर्डा येथील वडार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम मी करणार आहे,तसेच पुढील काळात तुमची साथ माझ्याबरोबर राहू द्या मी सदैव तुमच्या बरोबर राहणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी सागर गुळवे, फिरोज मापाडी, भास्कर गोपाळघरे, बाळू गीते, प्रशांत कांबळे,आकाश पवार, ओमसिंग भैसडे, टील्लू पंजाबी,संजय सुर्वे, बबन मदने, राम ढेरे, राजू लोंढे, पत्रकार अनिल धोत्रे, बापू ढगे,महाराज सकट, मोहसीन तांबोळी, शंकर गायकवाड, गणेश सुळ, सचिन सुरवसे, सोनू विटकर, राजकुमार चौगुले, महेश डोके, भीमराव सुरवसे, परमेश्वर सुरवसे, संदीप सुरवसे, तात्या सुरवसे, संदीप मुरकुटे,महेश डोके, बबलू डोके, मेघराज सुरवसे, प्रकाश सुरवसे, इत्यादी सह खर्डा वडार समाजातील कार्यकर्ते व बहुसंख्येने खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दत्तराज पवार यांनी केले तर आभार रतिलाल डोके यांनी मानले.

– चौकट –
खर्डा वडार समाजाचे पूर्वीचे कार्यालय हे जुन्या अवस्थेतील होते या कार्यालयाचा नूतनीकरण करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला होता, त्याप्रमाणे वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे व उपाध्यक्ष मच्छिंद्र येवले यांनी पुढाकार घेतला त्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून कार्यालयाला नवीन फरशी, नवीन स्लाइडिंग खिडक्या, नवीन पत्रे, प्लास्टर करून रंगरंगोटी, टेबल खुर्च्या, फॅन, एक मोठा एलसीडी ६३ इंची टीव्ही या ठिकाणी बसविण्यात आला असून कार्यालयासमोर ग्रामपंचायतच्या वतीने पेविंग ब्लॉक बसविण्यात येणार आहेत, हे कार्यालय खर्डा बस स्थानक व पोलीस स्टेशन समोर असल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी असते, मिटींग व एकत्र येऊन बैठका घेण्यासाठी खर्डा वडार समाजासाठी हे कार्यालय मोठी पर्वणीच ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here