जामखेड न्युज——
ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने २९ जून रोजी संविधान समता दिंडीचे आयोजन
ग्रामीण विकास केंद्र जामखेड व कोरो मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २९ जून रोजी सितारामगड खर्डा ते धाकटी पंढरी धनेगाव अशी संविधान समता दिंडी निघणार असल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी दिली.
खर्डा येथील सिताराम गडावर संविधान समता दिंडीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्याच्या बैठकीत ते बोलत होते. बाळगव्हाण येथील वस्ताद आनंद गोपाळघरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ, प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत, संविधान प्रचारक विशाल पवार, तुकाराम पवार, गणपत कराळे, दिपाली काळे, पप्पू गोपाळघरे, भीमराव सुरवसे, लाला वाळके, दादापाटील दाताळ,नितीन आहेर, लखन जाधव,सलीम मदारी, बबन मदने, सुनिता कांबळे, रजनी औटी, ईश्वर पवार, शंकर पवार, साधना पवार, यांच्यासह खर्डा ,सातेफळ, सोनेगाव ,धनेगाव, तरडगाव ,वंजारवाडी, येथील कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

संविधान समता दिंडीचे हे दुसरे वर्ष आहे. या दिंडी मार्गावरील गावामध्ये भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले हक्क ,अधिकार, व मूल्य याबाबत जाणीव जागृती करण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये सर्व जाती धर्मातील स्त्री ,पुरुष ,युवक ,युवतींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या संविधान समता दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले.
या दिंडीमध्ये वारकऱ्यांच्या वेशभूषेतील कार्यकर्ते भारतीय संविधानाची प्रतिकृती, टाळ, मृदुंग, विणा, हाती घेऊन प्रबोधनाची गाणी सादर करणारे पथक सहभागी होणार दिंडी मार्गावरील खर्डा ,सातेफळ, तरडगाव ,सोनेगाव, धनेगाव ,या गावात स्वागत फलक लावण्यात येणार असून प्रत्येक गावात या संविधान समता दिंडीचे स्वागत होणार आहे.
सायंकाळी पाच वाजता श्री विठ्ठल मंदिर धनेगाव येथे प्रबोधन सभेने या दिंडीचा समारोप होणार आहे. विशाल पवार यांनी प्रास्ताविक केले, बापू ओहळ यांनी या दिंडीचा उद्देश स्पष्ट केला, भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम पवार यांनी आभार मानले. यावेळी सलीम मदारी, गणपत कराळे, सुनिता कांबळे, आनंद गोपाळ घरे , यांनी आपले मनोगत व्यक्त केले.






