खर्डा परिसरातील सोनेगाव, धनेगाव,जवळके येथे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

0
133

जामखेड न्युज——

खर्डा परिसरातील सोनेगाव, धनेगाव,जवळके येथे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

 तालुक्यातील जवळके धनेगाव सोनेगाव या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अंदाजे सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

यामध्ये दोन कुक्कुटपालन धारकांचे संपूर्ण शेड मधील कोंबड्या मरून पत्रे उडून जाऊन मोठे नुकसानीसह अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा ,घरावरील पत्रे, गाय गोठ्याचे शेड, झाडा सह दोन बैल जखमी होऊन मोठे नुकसान झाले. 


याबाबत जामखेड तालुक्यातील जवळके येथील बाबासाहेब किसन कांबळे यांच्या शेड गावरान कोंबडीचे व्यवसाय आहे सोमवारी चार ते साडेपाचच्या दरम्यान झालेल्या जोरदार वादळ वादळी वाऱ्यासह पावसामुळे बाबासाहेब किसन कांबळे यांचे कोंबडी पालन शेडमध्ये अंदाजे २२०० शे ते २४००शे चे गावरान कोंबड्या ठेवल्या होत्या या वादळी वाऱ्यासह पावसात शेड पडल्यामुळे या शेड मधील सर्वच्या सर्व शेडगाव कोंबड्या मरण पावल्या. त्याचबरोबर या शेडमध्ये ठेवलेले दहा पोते पशुखाद्य पावसात भिजून खराब होऊन या शेतकऱ्याचे साडेतीन ते चार लाख रुपये चे नुकसान झाले. तसेच याच गावातील सोमनाथ ज्ञानदेव पारखे यांचे ४००० क्रॉप बॉयलर जातीचे कोंबडीचे अंदाजे आठ दिवस वयाचे पिल्ले या कुक्कुटपालनात शेडमध्ये ठेवले असता शेड वरील ७० ते ८० पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले याचबरोबर पोल्ट्री शेड चे पूर्वेकडील बाजूस भिंत पिल्यांच्या अंगावर पडल्यामुळे व काही पिले जोरदार पावसाच्या मारामुळे मरण पावली तर काही अंगावर शेड पडल्यामुळे मरण पावले. तसेच शेडमध्ये पंधरा पोते पशुखाद्य भिजून खराब झाले यामध्ये सोमनाथ ज्ञानदेव पारखे यांचे सुमारे पाच लाख रुपये चे कोंबडी शेडचे नुकसान झाले.

तसेच जवळे गावातील बोधले महाराज, बंडू रघुनाथ वाळुंजकर, दत्तात्रय छगन वाळूंजकर यांच्या लिंबाच्या बागाचे नुकसान झाले. तर दिनकर भानुदास बोराटे यांच्या गोठ्यावरील पत्रा अंगावर पडल्यामुळे बैल जखमी झाला. तर कुंडलिक महादेव विधाते यांचाही बैल जखमी झाला. तसेच गावातील हनुमंत सर्जेराव वाळुंजकर ,अण्णा तुळशीराम वाळुंजकर, धर्मराज दाजी डांबरे ,तानाजी रामा बोराडे ,किसन दशरथ कांबळे ,गोवर्धन दशरथ कांबळे यांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून जाऊन नुकसान झाले .तसेच काही शेतकऱ्यांच्या दारातील आंबा, चिंच, लिंबू ,पिंपरी, बाभळ, नांदुरकी सारखे झाड वादळी वाऱ्याच्या पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून काही झाडे उन्मळून पडले .

धनेगाव येथील तीन घरावरील पत्रे उडाले या प्रकारे शेतकऱ्यांच्या फळबागासह कुक्कुटपालन, गाय गोठा, घरावरील पत्र्याचा आदी विविध ठिकाणचे पंचानामे कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी केले.
शेतकऱ्यांच्या फळबाग धारकांच्या व कुक्कुटपालन धारकांना लवकर लवकर शासनाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here