साकत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमा सदाशिव वराट यांचा सुरेखा शाहदेव वराट यांना जाहीर पाठिंबा!! सुरेखा शाहदेव वराट यांच्या विजयाची औपचारिकता बाकी! !

0
245

जामखेड न्युज——

साकत ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमा सदाशिव वराट यांचा सुरेखा शाहदेव वराट यांना जाहीर पाठिंबा!!

सुरेखा शाहदेव वराट यांच्या विजयाची औपचारिकता बाकी! !

 

तालुक्यातील साकत ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक चार मधील पोटनिवडणुकीत उमा सदाशिव वराट यांनी सुरेखा शाहदेव वराट यांना जाहीर पाठिंबा दिल्याने सुरेखा शाहदेव वराट यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहिली आहे.

प्रभाग क्रमांक चार मधील ग्रामपंचायत सदस्य
रतनबाई चंद्रकांत वराट यांच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. यामुळे पोटनिवडणूक लागली होती. चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
राणी नागनाथ वराट
इंदुबाई भागवत वराट
उमा सदाशिव वराट
सुरेखा शाहदेव वराट
या चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी राणी नागनाथ वराट व इंदुबाई भागवत वराट यांनी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत माघार घेतली होती. दोन उमेदवार शिल्लक होते. दुरंगी लढत होणार असे असताना उमा सदाशिव वराट यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सुरेखा शाहदेव वराट यांना जाहीर पाठिंबा दिल्याने सुरेखा शाहदेव वराट यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे. यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

श्री. साकेश्वर ग्रामविकास पँनलच्या
सुरेखा शाहदेव वराट यांचा विजय निश्चित झाला आहे. प्रभाग क्रमांक चार सर्व सर्वसाधारण स्त्री साठी राखीव होता एकुण मतदान ७७६ मतदार होते. पण उमा सदाशिव वराट यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने सुरेखा शाहदेव वराट यांचाच विजय निश्चित झालेला आहे.

उमा सदाशिव वराट यांचा जाहीर पाठिंबा घेत
श्री. साकेश्वर ग्रामविकास पँनलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री साकेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी पँनल प्रमुख जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय वराट, माजी चेअरमन व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे स्वीय साहायक प्रा. अरूण वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, सरपंच हनुमंत पाटील,
उपसरपंच राजाभाऊ वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, सदाशिव वराट, हभप उत्तम महाराज वराट, बाळासाहेब वराट, सदस्य विठ्ठल वराट, महादेव वराट, सचिन नेमाने, नागनाथ वराट, युवराज वराट, पोपट वराट, दादासाहेब वराट, शाहदेव वराट, नानासाहेब लहाने, भरत लहाने, माणिक वराट, अविन लहाने, किरण वराट, गणेश कडभने, राजू कडभने, विठ्ठल कडभने, सुरेश नेमाने, शाहदेव कडभने, पांडुरंग सानप, महादेव वराट, युवराज मुरूमकर, राम जावळे, नागनाथ अडसूळ, गोरख अडसूळ, अशोक वराट, भाऊसाहेब वराट, श्रीकांत अडसूळ, शहाजी वराट, सतिश वराट, विष्णू लहाने, अंकुश वराट, मारूती वराट, सिताराम वराट, सुदाम वराट, सुरेश वराट, शरद वराट, भरत भोरे, रामहारी वराट, छगन वराट, वसंत वराट, प्रकाश गवळी, दिलीप वराट, अजित वराट, बिभीषण वराट, भाऊसाहेब लहाने, बाबुराव लहाने, नाशिक लहाने, मारूती लहाने, झुंबर वराट, बाबासाहेब वराट, संदिपान वराट, दत्तात्रेय वराट, वशिष्ठ वराट, संभाजी वराट, नवनाथ वराट, रामदास वराट, हरिदास वराट, मनोज वराट, राहुल वराट सर, गंगाराम पुलवळे, काशिनाथ पुलवळे, विष्णू वराट, परमेश्वर वराट, गोरख वराट, सुनील वराट यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here