जामखेड न्युज——
सावळेश्वर उद्योग समुहाच्या वतीने रमेश आजबे यांनी दोन धाम करून आलेल्या भाविकांचे केले स्वागत

एकवीस दिवसाचा प्रवास करत बद्रीनाथ, केदारनाथ सह वैष्णोदेवी या दोन धामची यात्रा करत जामखेडमध्ये परत आलेल्या भाविकांचा सावळेश्वर उद्योग समुहाच्या वतीने रमेश (दादा) आजबे यांनी फटाक्यांची आतषबाजी तसेच फुलांची उधळण करत रांगोळीच्या साहाय्याने भाविकांचे स्वागत केले.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा, उतरांचल, हरिद्वार, जम्मू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र असा एकवीस दिवसाचा प्रवास करत बद्रीनाथ, केदारनाथ सह वैष्णोदेवी या दोन धामची यात्रा करत आज जामखेड मध्ये भाविक परतले यांचे रमेश (दादा) आजबे यांनी स्वागत केले.

सावळेश्वर उद्योग समुहाच्या माध्यमातून रमेश (दादा) आजबे यांनी आजपर्यंत केलेली कामे मंदिर जिर्णोद्धार, रंगकाम, वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांची सोय, गटारे बांधकाम, अनेक ठिकाणी लाईटची सोय, महाशिवरात्रीला शंकराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भावीक भक्तांसाठी फराळाची सोय, अनेक शिवरस्ते, अनेक ठिकाणी वृक्षारोपण, झाडांना संरक्षक जाळी, उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा, अनेक शाळांना होम थिएटर, कबड्डी, क्रिकेट टीमसाठी कीटचे वाटप, कोरोना काळात अनेकांना मास्क, सॅनिटाजर, किराणा कीटचे वाटप, भारतीय संविधान दिनानिमित्त स्नेह भोजन, मकरसंक्रांत निमित्त विविध कार्यक्रम, रक्षाबंधन निमित्त झाडांना राखी बांधणे, भक्ती शक्ती महोत्सवात मंडप व लाईटची व्यवस्था केली आहे.

संपुर्ण शहरात दुकानदारांना डस्टबिन वाटप, स्वच्छता अभियान लोकचळवळ बनविली हरित जामखेड साठी अनेक ठिकाणी वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले, रमजान ईदमध्ये मुस्लिम बांधवांना फळे वाटप, अनेक ठिकाणी शाळांना मदत सारोळा येथे शाळेस गेट बसवून दिले, बीड रोड ते ल. ना. होशिंग विद्यालयास जोडणारा तीस वर्षांपासून चा बंद रस्ता चालू करून पेव्हिंग ब्लॉक बसवले लाईटची सोय केली ग्रामीण रुग्णालय बोअरवेल घेऊन मोटार बसवून दिली लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली या सह अनेक अशी लोकोपयोगी कामे मार्गी लावलेली आहेत.
कोट्यावधी रूपयांची पदरमोड करून अनेक लोकोपयोगी कामे रमेश दादा आजबे यांनी मार्गी लावलेली आहेत. शहरासह परिसरात कोणाला काही अडचण आली तर लोक हक्काने रमेश आजबे यांना सांगतात आणि त्यांच्या कडून ती अडचण सुटते. अनेक वर्षांपासून ते संविधान दिन व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येणाऱ्या सर्व लोकांची जेवन व पाण्याची सोय करतात. अशा प्रकारे लोकोपयोगी कार्यात रमेश आजबे नेहमीच अग्रेसर असतात.





