आमदार रोहित पवार यांनी लुटला क्रिकेटचा आनंद

0
183
नाशिक प्रतिनिधी
नाशिक शहरात ‘विहित क्रिकेट क्लब’च्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी  लुटलाय. रोहित पवार नाशिक मध्ये आले असता विहित क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी त्यांना खेळण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्यांनासुद्धा क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. ते हातात बॅट घेऊन मैदानात उतरले आणि उपस्थितांबरोबर क्रिकेट खेळले.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत ही माहिती दिली. नाशिक शहरात ‘विहित क्रिकेट क्लब’च्या खेळाडूंनी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांचा हा आग्रह आणि माझं क्रिकेट प्रेम या दोन्ही गोष्टींमुळं मला इथं बॅट हाती घ्यावी लागली. त्यांच्यासोबत थोडा वेळ क्रिकेट खेळलो असता मलाही आनंद वाटला, असं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणालेत.
रोहित पवारांनी आवर्जून वणीच्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यात रोहित पवारांनी आवर्जून वणीच्या सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतलं. नाशिक दौऱ्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवीची मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी राज्यावरचं आर्थिक आणि कोरोनाचं संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना रोहित पवार यांनी केली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेले 8 महिने होता. त्यामुळे प्रदीर्घ काळ टाळेबंदी होती. या सगळ्यात राज्याचं महसुली उत्पन्न देखील बंद होतं. त्यामुळे राज्यावर मोठं आर्थिक संकट आलं. देवीची मनोभावे पूजा करून कोरोनाचं आणि आर्थिक संकट दूर कर, अशी प्रार्थना केल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. यावेळी रोहित पवार यांच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार आणि आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.
नाशिकच्या कळवण तालुक्यातील आदिवासी भागात कन्सरा माऊली डोंगऱ्या देवाचा उत्सव सुरू आहे. हा उत्सव शेकडो वर्षांपासून या भागात साजरा केला जातोय. शेकडो वर्षांच्या परंपरेला अनुभवण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते. रोहित पवार यांना झिरवळ यांनी निमंत्रण दिले होते. पवार कुटुंब आणि आदिवासी बांधवांचं नातं फार पूर्वीचं आहे. त्यामुळे आदिवासी समजून घेण्यासाठी रोहित पवारांनी उत्सवाला उपस्थिती लावली. विशेष म्हणजे रोहित पवारांनी परंपरिक जेवण आणि पावरी वाद्य वाजवत आदिवासींसोबत उत्सव साजरा केला. बांधवांनी भेट म्हणून दिलेले पावरी वाद्य त्यांच्याकडून शिकून वाजवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर रोहित पवार आणि नरहरी झिरवळ यांनी मिळून देवाचा खुट्या घेत पारंपरिक नृत्य केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here